पनवेल महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या रुचिता लोंढे यांचा विजय

Ruchita Gurunath Londhe

नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या नगरसेवक पदासाठी गुरुवार दिनांक ९ जानेवारी रोजी झालेल्या पनवेल महानगर पालिकेच्या प्रभाग क्र. १९ ब साठी झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या कन्या, भाजपाच्या रुचिता गुरुनाथ लोंढे या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या. त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप या महाविकास आघाडीच्या स्वप्नल लक्ष्मण कुरघोडे यांचा ३८४४ मतांनी पराभव केला. रुचिता लोंढे यांना ६१९८ मते मिळाली तर स्वप्नल कुरघोडे यांना २३८७ मते मिळाली तसेच नोटा १७८ वेळा वापरण्यात आला.