पनवेलमधील पीर करमअली शहाबाबा दग्र्याच्या उरूस सुरु

Panvel

पनवेलमधील पीर करमअली शहाबाबा दग्र्याच्या वतीने दरवर्षी उरूस साजरा करण्यात येतो. यंदा हा उरूस बुधवार दि. ५ फेब्रुवारीला सुरु होऊन सोमवार दि. १० फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. याची पूर्वतयारी झाली असून दर्गाह देखील सजविण्यात आला आहे. पनवेलमध्ये हा एकमेव उरूस हिंदू-मुस्लिम बांधव मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात तसेच लहान मुले विविध प्रकारच्या पाळण्यांचा आनंद घेतात. रोषणाईच्या झगमटात सजलेली आकर्षक दुकाने या उरुसाचे प्रमुख आकर्षण असते. परंपरेनुसार दग्र्यावर चादर चढविण्याचा पहिला मान येथील बापट कुटुंबीयांना दिला जातो.

अगदी मुंगीलाही शिरायला जागा नसणारी गर्दीचा अनुभव असणारा पूर्वीपासून चालत आलेला हा उरूस महानगर पालिका ग्राउंड आणि याकूब बेग हायस्कूल तसेच आजूबाजूच्या रस्त्यावर विविध प्रकारचे खाण्याचे, खेळण्यांचे, महिला वस्तू आदी प्रकारचे दुकाने मोठ्या प्रमाणात लावली जात. परंतु आता उत्सव साजरा करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे रस्त्यावर दुकाने लावण्यास मनाई करण्यात आली असून खरेदीदाराच्या आनंदावर विरजण पडले असून त्याचा फटका पनवेलच्या उरुसाला देखील बसला आहे.

Leave a Reply