कोरोना – पनवेलमधील दुकाने शुक्रवारपासून बंद

Panvel

सध्या वेगाने पसरत चाललेल्या कोरोना (Covid-19) या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता पनवेल महानगरपालिकेने कडक पाऊल उचलत पुण्याच्या धर्तीवर पनवेलमधील जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने शुक्रवार दिनांक २० मार्च ते ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पनवेलचे आयुक्त श्री. गणेश देशमुख ह्यांनी बुधवारी रात्री जाहीर केला.

पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाचे रुग्ण वाढत असून त्याला त्यावर उपाय म्हणून पनवेल परिसरातील सर्व दुकाने बंद राहिल्यास रस्त्यावरील गर्दी कमी होऊन कोरोना विषाणूचा फैलाव होण्यापासून आळा घालता येईल यादृष्टीने हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पनवेलमधील नागरिकांनी पुढील संपूर्ण आठवडा घरात राहून काढावा असेही महानगरपालिकेच्या प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आले आहे.

बेकरी, दुग्धजन्य पदार्थ, भाजीपाला, फळे, मेडिकल, किराणा इत्यादी दुकाने खुली राहण्यास मुभा दिली असून इतर सर्व दुकाने पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच जर कोणी दुकान चालू ठेवेल त्यावर दंडात्मक कार्यवाही केली जाईल असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.

शुक्रवारपासून महानगरपालिकेचे अधिकारी गाडीमधून उद्गोषणा करत सर्वांना आवाहन करतील आणि त्यानंतर मात्र कठोर कार्यवाहीला सुरुवात करतील. तरी सर्वांनी लोकहिताच्या दृष्टीने सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply