kavita choutmol, Jagdish Gaikwad

पनवेलच्या महापौरपदी पुन्हा डॉ. कविता चौतमल आणि उपमहापौरपदी जगदीश गायकवाड

Panvel

आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात शुक्रवार दि. १०, जानेवारी रोजी झालेल्या महापौर आणि उपमहापौर पदासाठीच्या निवडणुकीत पनवेलच्या महापौर पदी पुन्हा डॉ. कविता चौतमल याची निवड झाली असून, उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपा आणि आरपीआय युतीचे श्री जगदीश गायकवाड हे विजयी झाले आहेत ते ४९ विरुद्ध २७ मतांनी निवडून आले आहेत.

महापौरपद हे पुन्हा एका महिलांसाठी राखीव असल्या कारणाने भाजपने विद्यमान महापौर डॉ. कविता चौतमल यांना पुन्हा संधी दिली तर त्यांच्याविरुद्ध शेकापतर्फे दर्शना भोईर यांनी अर्ज भरला. तसेच उपमहापौरपदासाठी भाजपने जगदीश गायकवाड यांना संधी दिली, त्यांच्याविरुद्ध शेकापच्या सुरेखा मोहोकर यांनी अर्ज दाखल केला होता. ७८ सदस्यसंख्या असलेल्या पनवेल महानगर पालिकेत भाजपचे ५१ नगरसेवक आहेत, त्यामुळे भाजपाचे वर्चस्व असलेल्या पनवेल महागरपालिकेच्या या निवडणुकीत फक्त औपचारिकता बाकी होती.

Leave a Reply