पनवेल मध्ये भाजप सांस्कृतिक सेल तर्फे पनवेल मनोरंजन अनलॉक २.० जल्लोषात सादर

Panvel

दि. २२ ऑक्टोबर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर बंद असलेल्या रंगभूमीची द्वार पुन्हा उघडल्यामुळे रसिकांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. 


याप्रसंगी पनवेल मधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात भाजप सांस्कृतिक सेल तर्फे पनवेल मनोरंजन अनलॉक २.० चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात संगीत, नृत्ये आणि एकांकिकेचा समावेश होता. 


गणेश वंदना आणि पनवेलकर ग्रुप प्रतीक बहिरा आणि टीमने केलेल्या तान्हाजी चित्रपटातील फ्युजन डान्सने जोषपूर्ण वातावरणनिर्मिती केली. तसेच सामगंध पनवेल येथील गायक आणि वाद्यवृंद यांनी सादर केलेल्या गीत मेजवानीने रसिकांची मने तृप्त झाली.  


कलाविष्कार रत्नागिरी यांनी सादर केलेल्या बारस या पारितोषिकप्राप्त एकांकिकेने या कार्यक्रमाचा शेवट झाला.


याप्रसंगी पनवेलचे आमदार श्री. प्रशांतदादा ठाकूर आणि सभागृह नेते श्री परेशजी ठाकूर, भाजपचे लातूरचे सभागृह नेते शैलेश गोजमगुंडे आदी मान्यवर उपस्थित होते. 


या कार्यक्रमाला  पनवेलमधील रसिकांचं तुफान प्रतिसाद मिळाला. सर्व सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करत मनोरंजन अनलॉक २.० कार्यक्रम पार पडला.