मंडला कला भोकरपाडा येथील चित्रकार सोनाली कुंभार यांनी उत्तम प्रकारे मंडल कला बनवलेली आहेत..

Marathi Panvel

मंडला कला ही  खूप जुनी आहे आणि शतकानुशतके लोक मंडला बनवत आहेत. मंडल हा शब्द संस्कृतमधून आला आहे आणि त्याचा अर्थ “वर्तुळ” आहे आणि एक रचना किंवा नमुना आहे. मंडला कलेचा उगम 3000 वर्षांपूर्वी हिंदू धर्मात आणि नंतर बौद्ध धर्मात झाला असे मानले जाते.
मांडला कलेचा इतिहास मोठा आहे. हे त्याच्या खोल आध्यात्मिक अर्थासाठी आणि परिपूर्णतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ओळखले जाते. अनेक लोक आणि संस्कृतींचा असा विश्वास आहे की मंडलांचा खोल आंतरिक अर्थ आहे.


हीच मंडला कला भोकरपाडा येथील चित्रकार सोनाली कुंभार यांनी  ब्लॅक पेनचा वापर करून उत्तम प्रकारे मंडल कला  बनवलेली आहेत.
त्यांनी कलेचं कोठेही शिक्षण न घेता त्यांनी खूप छान प्रकारे मांडला कला, लहान असल्यापासून  त्यांनी स्वतः त्यांच्या कलेत बदल घडवले आहेत, उत्तम प्रकारे  ते काम करत आहेत.
सोनाली यांनी वेगवेगळे आकार  घेवुन मंडला कला तयार केली आहे, ऐतिहासिक  मंदिर,आयफेल टॉवर परीस, वर्तुळाकार, नैसर्गिक आकार, फुलाचा आकार, असे आकार  घेतले आहेत, मंडला कला मधील वर्तुळे तंतोतंत, काळजीपूर्वक मोजलेली, भौमितीय आणि उत्तम प्रकारे सममितीय असतात.


ती बनवताना वाळू, फुले आणि नैसर्गिक गोष्टींचा वापर केलेला आहे. मांडला कला हा भारतीय लोककलातील रांगोळीचा एक प्रकार आहे. मंडला बनवल्याने शांततेची भावना येते आणि कौशल्य सुधारते. संयम आणि एकाग्रता विकसित करते, सोनालीचा खूप छान मंडला कला मध्ये खूप छान  हातखंडा आहे.