narayanbaba goshala

पनवेलमधील नारायणबाबा आश्रमातील बेकायदा गोशाळा

Panvel

पनवेल येथील नारायण बाबा आश्रम (भगवती साई संस्थान) यांनी बेकायदा आलिशान एअर कंडिशन गोशाळा पनवेल महानगरपालिका याची कोणतीही परवानगी न घेता बांधली आहे. तसेच धर्मादाय आयुक्त, मुंबई आणि अलिबाग यांनादेखील अंधारात ठेवले आहे.

हे बांधकाम करताना कायद्यानुसार टेंडर नोटीस न काढता आर्थिक भ्रष्टाचार केला आहे. या गोशाळेमुळे आजूबाजूच्या असलेल्या सोसायटीमधील नागरिकांना मलमूत्रामुळे यामुळे डास व घाणीचा त्रास होत असून त्यांनी अनेक वेळा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे तक्रारी केले आहेत पण त्यावर कोणतीही कार्यवाही अजून झाली झाली.

अलीकडेच केलेल्या संशोधनात असे आढळून आले कि होलिस्टेन जातीच्या विदेशी गाईंच्या दुधामुळे डायबिटीस आणि कॅन्सरची शक्यता वाढते. त्या गोशाळेतील गाईंचे दूध नारायण बाबा आणि ट्रस्टी पीत नसून ते जवळील झोपडपट्टीतील मुलांना सकाळ-संध्याकाळ वाटप केले जाते. भविष्यात या मुलांना किंवा त्यांच्या पालकांना डायबिटीस किंवा कॅन्सर झाल्यास त्याची जबादारी नारायणबाबा आश्रमची असेल असा आरोप स्थानिक नागरिक करीत असून करत आहेत.

तरी पनवेल महानगरपालिकेने तरी तेथील बेकायदा गोशाळेवर हातोडा मारावा अशी आशा येथील नागरिक करत आहेत.

कायद्याने महानगरपालिकेच्या हद्दीत गोशाळेला परवानगी देता येत नाही तरी नारायणबाबा आश्रम (भगवती साई संस्थान) यांनी सर्व नियमांना हरताळ फासून कायद्याचे उल्लंघन केले आहे.

हि गोशाळा बांधण्यासाठी साडेतीन हजार कोटीचा बँकेला चुना लावून पळून गेलेला किरण मेहता, वरुण इंडस्ट्रीज ली. (वरुण कॉंटिनेंटल), मुंबई याने आपल्या ५०० कर्मचाऱ्यांना पगार न देता आपल्या काळ्या पैश्यातून या गोशाळेकरता लाखो रुपयांची मदत केली आहे.

Leave a Reply