sai mata bhojanalay1

नारायण बाबा आश्रम पनवेल येथे बेकायदेशीर कॅन्टीन सुरु

Panvel

पनवेलमधील नारायण बाबा बाबा आश्रम {श्री भगवती साई संस्थान) च्या आवारात असलेले कॅन्टीन ( साई माता भोजनालय) ही पनवेल महानगर पालिकेची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे सुमारे चार हजार स्क्वेअर फूट बांधकाम पार्किंगचा जागेमध्ये केला आहे. ओरिजनल बिल्डींगतुम्ही खालील फोटो मध्ये पाहू शकता तसेच इतर फोटो मध्ये कॅन्टीनचा बेकायदेशीर झालेला विस्तार दिसून येत आहे.

कॅन्टीन मालकाने महानगरपालिकेची परवानगी व फूड आणि ड्रग ऑथॉरिटी कडून कोणत्याही प्रकारचे लायसन्स घेतले नसून तसेच नारायण बाबा ट्रस्ट आणि भगवती साई संस्थाने या कँटीन साठी धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेतलेली नाही. तसेच नियमबाह्य जाऊन स्वतःच्या मर्जीतील विश्वस्ताला ते अनधिकृत रित्या चालविण्यास दिले आहे.

या कॅन्टीन कमर्शील असूनदेखील त्यामध्ये वापरले जाणारे पाणी व लाईट घरगुती स्वरूपात वापरली जाते, त्याची पाणीपट्टी व लाईट बिल देखील भक्तांच्या दिलेल्या दानपेटीतून भरला जातो. तसेच अनधिकृत घरगुती गॅस सिलेंडर व अकुशल कामगार यांच्या साहाय्याने कॅन्टीन चालवून भक्तांचा जीव आणि आरोग्य धोक्यात टाकले जाते.

तरी पनवेल महानगर पालिकेतील प्रशासनाने या कँटीन विरोधात त्वरित कार्यवाही करावी.

Leave a Reply