पनवेल रेल्वेस्टेशन मध्ये सापडली बॉम्बसदृष्य वस्तू, लोकल केली रिकामी

Marathi Panvel

रवि. १५ मार्च, पनवेल: आज सकाळी पनवेल रेल्वे स्टेशनवर एका लोकलमध्ये हे बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्यामुळे मोठी खळबळ उडाली. पोलीस आणि अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी हजर झाले व संपूर्ण लोकल रिकामी करण्यात आली. त्याचबरोबर श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले. 

रेल्वेकडून तसेच पोलिसांकडून याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. तसेच प्रवाशांना फोटो काढण्यास मनाई केली असून प्लॅटफॉर्म क्रमांक एक व दोन बंद करण्यात आले आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक तीन व चार वरून लोकल सोडण्यात येत आहेत.

Leave a Reply