मंडला कला ही खूप जुनी आहे आणि शतकानुशतके लोक मंडला बनवत आहेत. मंडल हा शब्द संस्कृतमधून आला आहे आणि त्याचा अर्थ “वर्तुळ” आहे आणि एक रचना किंवा नमुना आहे. मंडला कलेचा उगम 3000 वर्षांपूर्वी हिंदू धर्मात आणि नंतर बौद्ध धर्मात झाला असे मानले जाते. मांडला कलेचा इतिहास मोठा आहे. हे त्याच्या खोल आध्यात्मिक अर्थासाठी आणि परिपूर्णतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ओळखले जाते. अनेक लोक आणि संस्कृतींचा असा विश्वास आहे की मंडलांचा खोल आंतरिक अर्थ आहे.
Mandla Kala Arts by Sonali Kumbhar
हीच मंडला कला भोकरपाडा येथील चित्रकार सोनाली कुंभार यांनी ब्लॅक पेनचा वापर करून उत्तम प्रकारे मंडल कला बनवलेली आहेत. त्यांनी कलेचं कोठेही शिक्षण न घेता त्यांनी खूप छान प्रकारे मांडला कला, लहान असल्यापासून त्यांनी स्वतः त्यांच्या कलेत बदल घडवले आहेत, उत्तम प्रकारे ते काम करत आहेत. सोनाली यांनी वेगवेगळे आकार घेवुन मंडला कला तयार केली आहे, ऐतिहासिक मंदिर,आयफेल टॉवर परीस, वर्तुळाकार, नैसर्गिक आकार, फुलाचा आकार, असे आकार घेतले आहेत, मंडला कला मधील वर्तुळे तंतोतंत, काळजीपूर्वक मोजलेली, भौमितीय आणि उत्तम प्रकारे सममितीय असतात.
ती बनवताना वाळू, फुले आणि नैसर्गिक गोष्टींचा वापर केलेला आहे. मांडला कला हा भारतीय लोककलातील रांगोळीचा एक प्रकार आहे. मंडला बनवल्याने शांततेची भावना येते आणि कौशल्य सुधारते. संयम आणि एकाग्रता विकसित करते, सोनालीचा खूप छान मंडला कला मध्ये खूप छान हातखंडा आहे.
Mumbai, India 26 May 2022
– Worldline, a global leader in payment services, has
partnered with Bank of India (BOI) to digitise several kinds of citizen-centric
services, fines and tax collections for Panvel City Municipal Corporation (PMC).
With this development, citizens of PMC can make payments via credit and
debit cards towards services like birth / death registration certificates, marriage
registration certificates, assessment fee, transfer fee, license fee, NOC, electricity
meter license, and daily charges among others. In addition, PMC is also
empowered to collect municipal tax and fines related to Covid19 regulations, sanitization,
encroachment, plastic ban and solid waste management fines from citizens.
Bank of India Android POS
Terminal powered by Worldline was tendered to Shri. Ganesh Deshmukh, Panvel
Municipal Commissioner by Shri. Rajendra Kokate, Deputy Zonal Manager, Bank of
India and Shri. Gulshan Pruthi, EVP, Worldline to mark the launch of
e-collection services.
Shri. Ganesh
Deshmukh, Panvel Municipal Commissioner, said,
“Digitalization of payment
collection services by Bank of India for PMC will not only bring convenience to
the citizens but also to the PMC staff as it helps in moving to an automated
process and avoid cumbersome manual challan/receipt processes. In addition, the
digital collection of taxes and fines brings transparency in the ecosystem and
builds confidence among citizens. We are happy to work with Bank of India and
Worldline to extend digital collection services for the citizens of PMC and
will continue to introduce such innovative solutions in future.”
Shri. Rajendra Kokate,
Deputy Zonal Manger, Bank of India, said,
“Digitization will help Panvel
Municipal Corporation (PMC) in enhancing the transparency and avoiding cash payments.
Bank of India has provided end-to-end solution right from the collection to
real-time dashboard which has automated the process and will ensure efficiency
at each level of users. With this initiative with PMC, we look forward to extend all kinds of
banking services by leveraging our wide presence in Maharashtra”
Shri. Gulshan Pruthi, EVP,
Worldline India said,
“Worldline has
been at the forefront of the digital revolution that is shaping new ways of making
payments. In our endeavor towards building a less-cash society, we are teaming
up with partner banks and government associations to drive digital payments
acceptance across the country. We are thrilled to offer the convenience of
making digital payments to the citizens of Panvel Municipal Corporation with
our long-term trusted partner – Bank of India.”
About Worldline
Worldline
[Euronext: WLN] is a global leader in the payments industry and the technology
partner of choice for merchants, banks and acquirers. Powered by 20,000
employees in more than 50 countries, Worldline provides its clients with
sustainable, trusted and innovative solutions fostering their growth. Services
offered by Worldline include instore and online commercial acquiring, highly
secure payment transaction processing and numerous digital services. In 2021,
Worldline generated a proforma revenue close to 4 billion euros.
Worldline India Pvt. Ltd., a wholly-owned subsidiary of Worldline, is
partner to over 40 banks and over 5000 marque clients comprising of ecommerce
giants, leading insurance players, D2C players across sectors. In India,
Worldline covers the whole payment value chain and end-to-end processes that
facilitate services to over 1.5 million merchants across 5000 towns and cities
in India, South Asia / Middle East. Services offered by Worldline in India are
in the areas of Merchant Acquiring, VAS, Card Issuance, National Electronic
Toll Collection, Risk Mitigation, Reconciliation, Loyalty solutions; and online
solutions like NextGen Payment Gateway, Subscription Payments, Payment
Orchestration Platform, Online Cross Border Solution, Tokenisation among
others. Supported by over 2000 members team, Worldline India is constantly
investing in its people and in the latest technologies to increase
efficiencies, drive innovation and enhance digital payments adoption across the
country.
दि. २२ ऑक्टोबर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर बंद असलेल्या रंगभूमीची द्वार पुन्हा उघडल्यामुळे रसिकांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
याप्रसंगी पनवेल मधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात भाजप सांस्कृतिक सेल तर्फे पनवेल मनोरंजन अनलॉक २.० चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात संगीत, नृत्ये आणि एकांकिकेचा समावेश होता.
गणेश वंदना आणि पनवेलकर ग्रुप प्रतीक बहिरा आणि टीमने केलेल्या तान्हाजी चित्रपटातील फ्युजन डान्सने जोषपूर्ण वातावरणनिर्मिती केली. तसेच सामगंध पनवेल येथील गायक आणि वाद्यवृंद यांनी सादर केलेल्या गीत मेजवानीने रसिकांची मने तृप्त झाली.
कलाविष्कार रत्नागिरी यांनी सादर केलेल्या बारस या पारितोषिकप्राप्त एकांकिकेने या कार्यक्रमाचा शेवट झाला.
याप्रसंगी पनवेलचे आमदार श्री. प्रशांतदादा ठाकूर आणि सभागृह नेते श्री परेशजी ठाकूर, भाजपचे लातूरचे सभागृह नेते शैलेश गोजमगुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला पनवेलमधील रसिकांचं तुफान प्रतिसाद मिळाला. सर्व सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करत मनोरंजन अनलॉक २.० कार्यक्रम पार पडला.
करोना व्हायरस पासून वाचण्यासाठी हे करा. Do's and Don's - Corona Virus
१. आपले हात वारंवार धुवा
1. Wash your hands frequently
२. सुरक्षित अंतर ठेवा.
2. Maintain social distancing
३. डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा.
3. Avoid touching eyes, nose and mouth
४. गर्दी करणे टाळा. शक्य असेल तर घरीच थांबा.
4. Don't go to Crowded Place, Stay at Home if Possible.
५. बाहेर जाणे आवश्यक असेल तर मास्कचा वापर करा किंवा नाक तोंड रुमालाने कव्हर करा.
5. Use Mask or Cover the Face when going out.
६. जर आपल्याला ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल तर लवकर डॉक्टरांना भेटा व त्याला संपूर्ण माहिती द्या आणि त्याने दिलेल्या सल्ल्याचे अनुकरण करा.
6. If you have fever, cough and difficulty breathing, seek medical care early, Stay informed and follow advice given by your healthcare provide
सध्या वेगाने पसरत चाललेल्या कोरोना (Covid-19) या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता पनवेल महानगरपालिकेने कडक पाऊल उचलत पुण्याच्या धर्तीवर पनवेलमधील जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने शुक्रवार दिनांक २० मार्च ते ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पनवेलचे आयुक्त श्री. गणेश देशमुख ह्यांनी बुधवारी रात्री जाहीर केला.
पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाचे रुग्ण वाढत असून त्याला त्यावर उपाय म्हणून पनवेल परिसरातील सर्व दुकाने बंद राहिल्यास रस्त्यावरील गर्दी कमी होऊन कोरोना विषाणूचा फैलाव होण्यापासून आळा घालता येईल यादृष्टीने हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पनवेलमधील नागरिकांनी पुढील संपूर्ण आठवडा घरात राहून काढावा असेही महानगरपालिकेच्या प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आले आहे.
बेकरी, दुग्धजन्य पदार्थ, भाजीपाला, फळे, मेडिकल, किराणा इत्यादी दुकाने खुली राहण्यास मुभा दिली असून इतर सर्व दुकाने पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच जर कोणी दुकान चालू ठेवेल त्यावर दंडात्मक कार्यवाही केली जाईल असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.
शुक्रवारपासून महानगरपालिकेचे अधिकारी गाडीमधून उद्गोषणा करत सर्वांना आवाहन करतील आणि त्यानंतर मात्र कठोर कार्यवाहीला सुरुवात करतील. तरी सर्वांनी लोकहिताच्या दृष्टीने सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
रवि. १५ मार्च, पनवेल: आज सकाळी पनवेल रेल्वे स्टेशनवर एका लोकलमध्ये हे बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्यामुळे मोठी खळबळ उडाली. पोलीस आणि अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी हजर झाले व संपूर्ण लोकल रिकामी करण्यात आली. त्याचबरोबर श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले.
रेल्वेकडून तसेच पोलिसांकडून याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. तसेच प्रवाशांना फोटो काढण्यास मनाई केली असून प्लॅटफॉर्म क्रमांक एक व दोन बंद करण्यात आले आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक तीन व चार वरून लोकल सोडण्यात येत आहेत.
कधी काही प्रसंगात कायदेशीर बाबीं किंवा नातेवाईकांच्या सोयीसाठी मृतदेह काही काळ जतन करून ठेवावा लागतो. त्यासाठी आवश्यक असणारे शवगृह पनवेल परिसरात फक्त महात्मा गांधी मिशन हॉस्पिटल, कळंबोली येथेच आतापर्यंत उपलब्ध होते. पानवेलसारख्या महानगरात ह्या सुविधेचा अभाव असल्यामुळे मृतांच्या नातेवाईकांना अत्यंत्य कठीण प्रसंगाला तोंड देत मृतदेह सांभाळावा लागत असे.
त्याची हि अडचण लक्षात घेऊन सदाशिव पेठ मित्रमंडळ, टिळक रोड पनवेल यांच्या प्रयत्नातून नव्यानेच निर्माण झालेल्या पनवेल उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात २ शीत शव पेटी (४ मृतदेहांसाठी) बसवून काम पूर्ण करून घेतले. आणि त्याचे लोकार्पण १२ फेब्रुवारी रोजी झाले.
यासाठी शिवसेनेचे स्थानिक नेते श्री. चंद्रशेखर सोमण यांनी मोठी भूमिका पार पाडली. याआधी देखील सोमण यांनी खाजगी कंपनीच्या सी.एस.आर. च्या माध्यमातून रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटर साठी पाच लाखाची ऍनेस्थेशिया तसेच अँटी रेबीज औषधे उपलब्ध करून दिली आहेत. त्यावेळी त्यांना या रुग्णालयात शीत शव पेटीची देखील आवश्यकता आहे असे लक्षात आले. अशा वेळी कोणत्याही सरकारी मदतीवर विसंबून न राहता त्यांनी आपल्या मित्र मंडळींच्या कानावर हि गोष्ट घालताच, सदाशिव पेठ मित्रमंडळ या कार्यासाठी धावून आले व वर्गणीतून दोन लाखांची मदत जमवली आणि योग्य तो पत्रव्यवहार करत शासनाची परवानगी मिळवली. तसेच विलंब न करता २८ जानेवारी रोजी यासंबंधी कामाची वर्कऑर्डर काढून कूलटच कंपनी ला कंत्राट दिले.
शीत शव पेटी
सदाशिव पेठ मित्रमंडळातर्फे पनवेल मध्ये गेली १४ वर्ष ऍम्ब्युलन्स व शववाहिका सेवा अत्यंत्य शिस्तीत, विश्वासू आणि सातत्यपूर्ण पद्धतीने चालू आहे. याचं मंडळाने लोकवर्गणीतून आणखी एक सुसज्ज रुग्णवाहिकेचा संकल्प सोडला आहे. त्यालाही परिसरातील नागरिकांकडून भरभरून मदत मिळत आहे.
याप्रसंगी चंद्रशेखर सोमण यांच्यासह मंडळाचे सदस्य श्रीकांत साठे, डॉ. मयुरेश जोशी, महेश गाडगीळ, संजय जोशी, श्रीकांत पाटणकर, अनिल कुळकर्णी, अविनाश सहस्त्रबुद्धे तसेच पनवेलचे वैद्यकीय अधीक्षक नागनाथ येमपले, महावितरणचे जयदीप नानोटे, शिवसेना शहरप्रमुख अच्युत मनोरे, संघटक प्रवीण जाधव, विभाग प्रमुख विश्वास पेटकर, अरुण ठाकूर, महाड बँकेचे व्यवस्थापक विचारे, हॉस्पिटल चे सर्व डॉक्टर्स, अधिकारी, हितचिंतक नागरिक व पत्रकार उपस्थित होते.
पनवेल येथील नारायण बाबा आश्रम (भगवती साई संस्थान) यांनी बेकायदा आलिशान एअर कंडिशन गोशाळा पनवेल महानगरपालिका याची कोणतीही परवानगी न घेता बांधली आहे. तसेच धर्मादाय आयुक्त, मुंबई आणि अलिबाग यांनादेखील अंधारात ठेवले आहे.
हे बांधकाम करताना कायद्यानुसार टेंडर नोटीस न काढता आर्थिक भ्रष्टाचार केला आहे. या गोशाळेमुळे आजूबाजूच्या असलेल्या सोसायटीमधील नागरिकांना मलमूत्रामुळे यामुळे डास व घाणीचा त्रास होत असून त्यांनी अनेक वेळा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे तक्रारी केले आहेत पण त्यावर कोणतीही कार्यवाही अजून झाली झाली.
अलीकडेच केलेल्या संशोधनात असे आढळून आले कि होलिस्टेन जातीच्या विदेशी गाईंच्या दुधामुळे डायबिटीस आणि कॅन्सरची शक्यता वाढते. त्या गोशाळेतील गाईंचे दूध नारायण बाबा आणि ट्रस्टी पीत नसून ते जवळील झोपडपट्टीतील मुलांना सकाळ-संध्याकाळ वाटप केले जाते. भविष्यात या मुलांना किंवा त्यांच्या पालकांना डायबिटीस किंवा कॅन्सर झाल्यास त्याची जबादारी नारायणबाबा आश्रमची असेल असा आरोप स्थानिक नागरिक करीत असून करत आहेत.
तरी पनवेल महानगरपालिकेने तरी तेथील बेकायदा गोशाळेवर हातोडा मारावा अशी आशा येथील नागरिक करत आहेत.
कायद्याने महानगरपालिकेच्या हद्दीत गोशाळेला परवानगी देता येत नाही तरी नारायणबाबा आश्रम (भगवती साई संस्थान) यांनी सर्व नियमांना हरताळ फासून कायद्याचे उल्लंघन केले आहे.
हि गोशाळा बांधण्यासाठी साडेतीन हजार कोटीचा बँकेला चुना लावून पळून गेलेला किरण मेहता, वरुण इंडस्ट्रीज ली. (वरुण कॉंटिनेंटल), मुंबई याने आपल्या ५०० कर्मचाऱ्यांना पगार न देता आपल्या काळ्या पैश्यातून या गोशाळेकरता लाखो रुपयांची मदत केली आहे.
पनवेलमधील नारायण बाबा बाबा आश्रम {श्री भगवती साई संस्थान) च्या आवारात असलेले कॅन्टीन ( साई माता भोजनालय) ही पनवेल महानगर पालिकेची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे सुमारे चार हजार स्क्वेअर फूट बांधकाम पार्किंगचा जागेमध्ये केला आहे. ओरिजनल बिल्डींगतुम्ही खालील फोटो मध्ये पाहू शकता तसेच इतर फोटो मध्ये कॅन्टीनचा बेकायदेशीर झालेला विस्तार दिसून येत आहे.
मूळ इमारत
अनधिकृत बांधकाम
अनधिकृत बांधकाम
कॅन्टीन मालकाने महानगरपालिकेची परवानगी व फूड आणि ड्रग ऑथॉरिटी कडून कोणत्याही प्रकारचे लायसन्स घेतले नसून तसेच नारायण बाबा ट्रस्ट आणि भगवती साई संस्थाने या कँटीन साठी धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेतलेली नाही. तसेच नियमबाह्य जाऊन स्वतःच्या मर्जीतील विश्वस्ताला ते अनधिकृत रित्या चालविण्यास दिले आहे.
या कॅन्टीन कमर्शील असूनदेखील त्यामध्ये वापरले जाणारे पाणी व लाईट घरगुती स्वरूपात वापरली जाते, त्याची पाणीपट्टी व लाईट बिल देखील भक्तांच्या दिलेल्या दानपेटीतून भरला जातो. तसेच अनधिकृत घरगुती गॅस सिलेंडर व अकुशल कामगार यांच्या साहाय्याने कॅन्टीन चालवून भक्तांचा जीव आणि आरोग्य धोक्यात टाकले जाते.
तरी पनवेल महानगर पालिकेतील प्रशासनाने या कँटीन विरोधात त्वरित कार्यवाही करावी.
पनवेलमधील पीर करमअली शहाबाबा दग्र्याच्या वतीने दरवर्षी उरूस साजरा करण्यात येतो. यंदा हा उरूस बुधवार दि. ५ फेब्रुवारीला सुरु होऊन सोमवार दि. १० फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. याची पूर्वतयारी झाली असून दर्गाह देखील सजविण्यात आला आहे. पनवेलमध्ये हा एकमेव उरूस हिंदू-मुस्लिम बांधव मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात तसेच लहान मुले विविध प्रकारच्या पाळण्यांचा आनंद घेतात. रोषणाईच्या झगमटात सजलेली आकर्षक दुकाने या उरुसाचे प्रमुख आकर्षण असते. परंपरेनुसार दग्र्यावर चादर चढविण्याचा पहिला मान येथील बापट कुटुंबीयांना दिला जातो.
पीर करमअली शहाबाबा दर्गा
अगदी मुंगीलाही शिरायला जागा नसणारी गर्दीचा अनुभव असणारा पूर्वीपासून चालत आलेला हा उरूस महानगर पालिका ग्राउंड आणि याकूब बेग हायस्कूल तसेच आजूबाजूच्या रस्त्यावर विविध प्रकारचे खाण्याचे, खेळण्यांचे, महिला वस्तू आदी प्रकारचे दुकाने मोठ्या प्रमाणात लावली जात. परंतु आता उत्सव साजरा करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे रस्त्यावर दुकाने लावण्यास मनाई करण्यात आली असून खरेदीदाराच्या आनंदावर विरजण पडले असून त्याचा फटका पनवेलच्या उरुसाला देखील बसला आहे.