अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना करण्यास केंद्र सरकारची मान्यता

India

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाने अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी ट्रस्ट स्थापन करण्यास मान्यता दिली आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोकसभेत केली. या ट्रस्टला “श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र “ असे नाव देण्यात आले आहे.

अयोध्यामधील वादग्रस्त ठिकाणी राम मंदिर बांधण्यास परवानगी देणाऱ्या सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्डाकडे ५ एकरांचा भूखंड ताब्यात देऊन राम मंदिर बांधण्यासाठी ट्रस्ट स्थापण्याचे आदेशही दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या ९ नोव्हेंबरच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाला महत्त्व आहे.

सभागृहातील सर्व सदस्यांना भव्य राम मंदिर बांधकामास पाठिंबा देण्याचे आवाहन करीत पंतप्रधान म्हणाले, “रामजन्मभूमी विषयावरील निर्णय बाहेर आल्यानंतर भारतीय जनतेने लोकशाही प्रक्रिया व कार्यपद्धतींवर उल्लेखनीय विश्वास दाखविला. मी भारताच्या १३० कोटी जनतेला अभिवादन करतो. ”

क्वचित प्रसंगी मोदींनी लोकसभेत शून्य तास पूर्वी भाषण केले आणि सांगितले की सरकार ‘सबका साथ सबका विकास’ धोरणासह पुढे जात आहे जेणेकरून प्रत्येकजण आनंदी असेल. “भारतात हिंदू असो, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, पारशी किंवा जैन, प्रत्येकजण एकाच कुटुंबातील एक भाग आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा विकास झालाच पाहिजे, असे ते म्हणाले.

केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी मोदींचे अभिनंदन करताना म्हटले आहे की, श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये १५ विश्वस्त असतील आणि त्यापैकी एक विश्वस्त कायमस्वरूपी दलित समाजातील असेल.

Leave a Reply