Panipat Movie

पानिपत : द ग्रेट बेट्रेयल चित्रपट महाराष्ट्र सरकारने केला टॅक्स फ्री

Cine News

अहमद शाह अब्दाली आणि मराठे यांच्यात झालेल्या तिसऱ्या पानिपत युद्धाची पार्श्वभूमी असलेल्या आणि मराठ्यांची शौर्यगाथा असलेला ‘पानिपत : द ग्रेट बेट्रेयल’ हा चित्रपट आता महाराष्ट्रातील प्रत्येक सिने रसिकांनी पाहावा यासाठी महाराष्ट्र सरकारने टॅक्स फ्री करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयासाठी ‘पानिपत : द ग्रेट बेट्रेयल’ या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

अडीचशे वर्षांपूर्वी झालेल्या पानिपतचा युद्ध मराठे हरले जरी असले तर त्यांनी गाजवलेला पराक्रम विजयापेक्षा कमी नव्हता. तसेच या पराभवाला तत्कालीन परिस्थिती जास्त प्रमाणात जबाबदार होती. या चित्रपटाच्या माध्यमाने तो इतिहास पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटात सदाशिवराव भाऊंची भूमिका अर्जुन कपूर याने तर अहमद शाह अब्दालीची भूमिका संजय दत्त याने साकारली आहे. तसेच पार्वतीबाईंच्या भूमिकेत क्रिती सेनॉन आहे.

Leave a Reply