पनवेल महानगरपालिका - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत महाराष्ट्र दिन निमित्ताने “भव्य रक्तदान व आरोग्य शिबिराचे” कामोठे येथे आयोजन केले आहे, पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी सदर आरोग्य शिबीर व रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घ्यावा.
? प्रमुख संकल्पना व मार्गदर्शक? मा श्री. गणेश देशमुख साहेब आयुक्त - पनवेल महानगरपालिका
? प्रमुख उपस्थिती ? मा श्री. विठ्ठल डाके साहेब उपायुक्त - पनवेल महानगरपालिका
कार्यक्रमाची तारीख : १ मे २०२२ वेळ : सकाळी १० ते २ वाजेपर्येंत स्थळ : माजी आमदार दत्तूशेठ पाटील विदयालय हॉल, तळमजला, सेक्टर -९, कामोठे
विशेष सूचना: सामाजिक संस्था व गृहनिर्माण सोसायटीच्या १० पेक्षा जास्त सभासदांनी एकत्र येऊन रक्तदान केल्यास सदर संस्थेला विशेष सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.
वरील शिबिरात सहभागी होणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी जास्तीसजास्त सभासदांनी/नागरिकांनी सहभाग घ्यावा, तसेच रक्तदान करणाऱ्या प्रमाणपत्र देण्यात येईल. अधिक माहितीसाठी संपर्क : 9372154533 किंवा ई-मेल : [email protected]
धन्यवाद!
आपली नम्र, श्रीमती सुवर्णा दखणे सहाय्यक आयुक्त - पनवेल महानगरपालिका
Listing your business with All About City it's an easy and free way to promote digitally with advance features and extend your reach to potential customers