व्हॅलेंटाईन डे म्हणजे शहिद दिवस नव्हे – व्हायरल सत्य
आज १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे निमित्त क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना श्रद्धांजली म्हणून एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पण आज खरंच श्रद्धांजली दिवस आहे का?
इंग्रजांविरुद्ध स्वतंत्र भारत मोहीम लढणारे क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना २३ मार्च १९३१ रोजी गुपचूपपणे लाहोर येथील तुरुंगात फाशी देण्यात आली.
आज कुठलीही माहिती एका सेकंदात पसरली जाऊ शकते त्यामुळे ती बातमी/पोस्ट फॉरवर्ड करताना त्याची सत्यता तपासून बघणे गरजेचे आहे.
आम्ही नागरिकांना विनंती करतो कि त्यांनी खोट्या पोस्ट व्हायरल करू नयेत आणि जर तुम्हाला अशी एखादी पोस्ट आली तर ती फॉरवर्ड न करता जो पाठवेल त्याला समजावून सांगण्यात यावे.
972 total views, 2 views today