रोटरी युथ लीडरशिप अवॉर्ड, पनवेल येथे संपन्न

रोटरी क्लब पनवेल मिडटाऊन आणि रोटारॅक्ट क्लब ऑफ पनवेल यांच्या वतीने आयोजित रविवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या “रायला” (रोटरी युथ लीडरशिप अवॉर्ड) मध्ये इनोव्हेटिव्ह बिजनेस आणि आंत्रप्रिनरशिप या विषयांवर मार्गदर्शन करण्याकरता  श्री अविनाश धर्माधिकारी आणि कौस्तुभ धारगलकर यांना आमंत्रित करण्यात आलं होतं.


या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रस्तावना होऊन सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले आणि लगेचच डॉक्टर कौस्तुभ धारगलकर यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणाला सुरुवात केली.

Kaustubh Dhargalkar

An entrepreneur-turned-academician & Innovation evangelist, speaker at TEDx platforms, founded three companies in the domain of Machine tools & automation. Sold his commercial interests in 2005, took a year off to learn the science of Yoga and then plunged into academics & research. He Has mentored 100+ startups since then. Currently, he consults large corporate on How to Enhance their Innovation Quotient. He trains executives in Design Thinking. He is a visiting faculty at well-known Business Schools & a Guest Speaker at various Educational Institutions.


आज त्यांनी लिंक्डइन या साईटचा उदाहरण देऊन स्पष्टपणे सांगितले की पहिले या साइटवर जॉब बघणाऱ्यांची संख्या जास्त होती तीच आज फ्रीलान्सिंग करणाऱ्यांची संख्या जास्त आहे याचा अर्थ आज लोक स्वतःचा व्यवसाय करण्यावर जास्त भर देत आहेत.
आजच्या जीवनात इनोव्हेशन किती महत्वाचं आहे हे स्पष्ट करताना विद्यार्थ्यांनी तसेच उद्योजकांनी नवनवीन संधी शोधून त्यावर काम करण्यास सुरुवात करावी असे सांगितले.

आजचे दुसरे व्यक्ते श्री. अविनाश धर्माधिकारी, ह्यांनी स्वतःची ओळख तीन वाक्यात करून दिली 


Avinash Dharmadhikari
  1. विवेकानंदांचा विद्यार्थी
  2. भारतमातेच्या पुत्र
  3. सरस्वतीचा पुजारी

अशीच करून दिली.


त्यांनी आपल्या मार्गदर्शनात आजच्या शिक्षण व्यवस्थेवर ताशेरे ओढत फक्त पुस्तकी अभ्यासात धन्यता न मानता बुद्धीमत्तेवर आधारित शिक्षणाची गरज एका खऱ्याखुऱ्या गोष्टीने पटवून दिली.
त्यांनीदेखील तीन सूत्र सांगितली

  1. स्व ला ओळखून आपले क्षेत्र निवडा
  2. त्यावर खूप मेहनत घ्या
  3. आणि त्या क्षेत्रात खूप उंची गाठा.


याबद्दल त्यांनी सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, विराट कोहली इत्यादींची उदाहरण दिली.

याचबरोबर त्यांनी नेहमी विद्यार्थी रहा हे देखील सांगायला ते विसरले नाहीत.

कार्यक्रमाच्यादिवशी खास दिल्लीहून येऊन त्याच दिवशी पुन्हा दिल्लीला निघाले यातून त्यांनी कमिटमेंट म्हणजे काय असते ह्याची देखील शिकवण देवून गेले.

 976 total views,  2 views today

Share This :

Anand Sontakke

Anand Sontakke is a Masters in International Business having 10 years experience in field of Import-Export

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *