श्रद्धांजली?? पण अजून किती दिवस

नमस्कार माझ्या भारतीय बंधू आणि भगिनींनो

Pulwama Attack

कालपासून सोशल मीडियावर पुलवामा येथे CRPF च्या जवानाच्या गाडीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांवर श्रद्धांजलीच्या पोस्टचा पाऊस पडत आहे.

Shraddhanjali

दुःख तर सगळ्यांनाच झालंय आणि रागदेखील प्रचंड आलाय, पण आपण फक्त श्रद्धांजलीच्या पोस्ट सोशल मीडियावर फॉरवर्ड केलं म्हणजे आपलं दुःख व्यक्त करून आपलं कर्तव्य बजावून झालं का?

कोणी म्हणतो
व्हॉट्सअँप वर काळा डीपी ठेवा
काही सैनिकांना श्रद्धांजली वाहतात
काही जण बदला घ्या म्हणून सांगतात.
तसेच काही जण तर सरकारने काय करावं आणि काय करू नये इतपत सल्ले देताना दिसतात.

पण हे सर्व करण्याआधी आपण स्वतःही काही आपली कर्त्यव्य बजावतो का?
अगदी मतदान करण्यापासून ते टॅक्स भरे पर्यंत, कचरा टाकण्यापासून ते ट्रॅफिकचे नियम पाळेपर्यंत

तुम्हाला वाटत असेल याचा इथे काय संबंध? सांगतो
आज आपला देश प्रगतीपथावर आहे, परंतु आजदेखील काही टेक्नॉलॉजीकल गोष्टी स्पेशली संरक्षण विषयक साधने आणि सैनिकांना लागणारे बुलेटप्रुफ जॅकेट, रडार इत्यादी आपल्याला बाहेरील देशाकडून फार मोठ्या किमतीत आयात करावी लागतात.

आपल्याकडे म्हण आहे प्रत्येक गोष्टीची सोंग घेता येतात पण पैशाचं सोंग नाही घेता येत.
सरकारच पण तसेच आहे. (मी कुठल्याही पक्षाविषयी बोलत नाही) आज बऱ्याच छोट्या- मोठ्या योजना, दैनंदिन साफसफाई, पाणी इतर सवलती देताना सरकारचा बराच पैसा खर्च होत असतो. जर आपण व्यवस्थित राहिलो तर त्यापैकी थोडा थोडा पैसा वाचेल तसेच जर कर चोरीचे प्रमाण घटले तर जो पैसा शिल्लक राहील तो देशाच्या संरक्षणासाठी वापरता येईल, नाही का?

तुमच्या मनात नक्कीच साशंकता असेल सरकार कशावरून तो पैसा संरक्षणावर खर्च करेल, त्यासाठीच तर निवडणुका असतात. आपणा जर योग्य व्यक्तींना निवडून दिलं तर नक्कीच होऊ शकत. आजदेखील मतदानच प्रमाण फक्त ५०-६०% टक्केच आहेत आणि त्यातील देखील काही घटकांना लालच देवून त्याची मत विकत घेतली जातात तर सुशिक्षित मतदार पिकनिक हॉलिडे असल्याप्रमाणे परिवारासोबत आणि मित्रमंडळी सोबत फिरायला जातात. हे कितपत योग्य आहे.

जर आपल्याला एखादी गोष्ट विकत घ्यायची असेल तर आपण १०० ठिकाणी चौकशी करतो आणि पारखून घेतो मग निवडणुकीच्या वेळी उमेदवारांनाविषयी आपण उदासीन का? आपली एखादी वस्तू खराब निघालीच तर आपण जाब विचारायला जातोच ना? मग उमेदवाराच्या बाबतीत आपण असा विचार का करत नाही? ते आपल्याला उत्तर द्यायला बांधील आहेत.

त्याचबरोबर अजून एक सांगायचं होत की, आज बऱ्याच ठिकाणी निषेध मोर्चे देखील काढण्यात आले…. काही लोक त्यात देखील सेल्फी घेण्यात मग्न होते… अरे प्रसंग काय काही लोक करतात काय? ते जाऊदे आपण आपल्या मुद्यावर येऊ.

श्रद्धांजली किंवा निषेध मोर्चा काढून जे जवान शहीद झालेत त्यांच्या कुटुंबीयांची झालेली हानी भरून निघेल का?

आता श्रद्धांजली आणि बदला या पुढच्या गोष्टी सोडून आपल्याला त्या जवानाच्या कुटुंबीयांना कसं सावरता येईल हे पाहावं लागेल.

बघा तुम्हाला पटत असेल तर. फक्त एक मेसेज फॉरवर्ड करण्यापेक्षा आपल्या कृतीतून आपण दिलेली श्रद्धांजली नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहचेल.

 2,026 total views,  2 views today

Share This :

Anand Sontakke

Anand Sontakke is a Masters in International Business having 10 years experience in field of Import-Export

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *