Exam Tips

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज पासून तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाची परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक!

तुम्हाला परीक्षेत उपयोगी पडतील अशा काही टिप्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

सर्वप्रथम स्वतःवर विश्वास ठेवा. शेवटचा क्षणी खूप प्रेशर असतं. सुरुवातीला तुम्ही खूप आशावादी असता आपलं सगळं झालंय पण जस जस वेळ जातो तस तस तुम्हाला टेन्शन यायला सुरुवात होते पण रिलॅक्स रहा आणि स्वत:वर विश्वास ठेवा.

अभ्यास करण्यासाठी शांत जागा शोधा जिथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं डिस्टर्बन्स होणार नाही आणि तुम्ही विचलित न होता अभ्यास करू शकाल अस पोषक वातावरण बनवा.

पेपरला जाण्याआधी आवश्यक वस्तू जसं हॉल तिकीट, पेन, पेन्सिल, पट्टी, इतर काही आवश्यक स्टेशनरी तपासून बघा.

पेपर भेटल्यावरती संपूर्णपणे वाचून घ्या आणि त्यापैकी कोणत्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला चांगल्यापैकी येतात ते प्रश्न आधी सोडवा आणि शेवटचे दहा मिनिटं तुम्ही लिहिलेला पेपर तपासायला ठेवून द्या जर एखादा प्रश्न क्रमांक किंवा तुमचा सीट नंबर वगैरे काय राहिला असेल तर ते सगळं नीट तपासून बघा.

तसेच परीक्षेच्या दरम्यान काय करू नये.

१. संपूर्ण परीक्षेच्या दरम्यान सोशल मीडियाचा वापर टाळा. जसं फेसबुक, व्हॉट्सअँप त्यामुळे तुमचा महत्वपूर्ण वेळ वाया जाऊ शकतो. तसेच एखाद्या पोस्ट मुळे तुमचं चित्त विचलित होऊ शकतो ज्याचा परिणाम तुमच्या पेपरवर होऊ शकतो.

२. परीक्षेदरम्यान कोणत्याही मित्राला किंवा मैत्रिणीला त्याच्या अभ्यासाबद्दल विचारू नका. कारण जर त्याचा अभ्यास तुमच्यापेक्षा जास्त झाला असेल तर त्याचा परिणाम तुमच्या आत्मविश्वासावर होऊ शकतो तसेच तुमच्या मनात नकारात्मक विचार येऊ शकतात. आणि जर त्याचा अभ्यास तुमच्या पेक्षा कमी झाला असेल तर तुम्ही ओवर कॉन्फिडन्स होऊन अभ्यास कमी करायला लागाल आणि त्याचा देखील वाईट परिणाम तुमच्या मार्गावर होऊ शकतो. म्हणुनच तुमच्या अभ्यासाची तुलना कोणाशीही करू नका.

३. जर तुम्हाला कोणी नवीन पुस्तकाबद्दल सजेस्ट केलं तर शेवटच्या क्षणाला तुमचं नवीन पुस्तक घेऊन रेफर करू नका कारण की जर त्यामध्ये काही वेगळे असेल किंवा एखादा मुद्दा त्याच्यामध्ये वेगळेपणाने मांडला असेल तर तर तुम्हाला टेन्शन येऊन तुमचा आधीचा केलेला अभ्यास देखील तुम्ही विसरू शकता. तुम्ही वर्षभर जो पुस्तक, रेफर बुक आणि प्रक्टीस पेपरवर अभ्यास केला त्यावरच भरोसा ठेवा.

४. आपला अभ्यासाची वेळ पुढे पुढे धकलत नेऊ नका आणि जर दोन पेपर दरम्यान जर गॅप भेटला तर आपला वेळ चॅप्टर प्रमाणे द्या जेणेकरून काही शिल्लक राहणार नाही.

५.  दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे अचानक आपल्या अभ्यासाची पद्धत बदलू नका. तुम्ही जस ठरवलंय तीच पद्धत वापरावी.

६. अभ्यासाचा ती टाईम टेबल तुम्ही बनवलाय त्याचप्रमाणे तो फॉलो करा. जर तुम्ही दिवसातून ८ तास अभ्यासासाठी द्यायचे ठरवलेय तर ते पुरेपूर मनापासून देण्याचा प्रयत्न करा.

७. जर तुम्ही एखादा चॅप्टर ऑप्शनला ठेवला असेल तर शेवटच्या क्षणी तो अभ्यासाला घेवू नका. त्यापेक्षा जो अभ्यास तुम्ही केलाय त्याचीच रिविजन करा.

८. शेवटच्या क्षणी फक्त आकृती बघुन अभ्यास करू नका, त्यापेक्षा लिखाण करून केलेला अभ्यास जास्त प्रभावी ठरतो.

९. परीक्षेच्या काळात बाहेरील खाद्यपदार्थ खाऊ नका त्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता, तसेच घरीदेखील साधं जेवण योग्य प्रमाणात घेत जा. तसेच असे पदार्थ  देखी खाऊ नका ज्यामुळे तुम्हाला झोप येऊ शकते. तुम्ही साधं जेवण आणि फळ शक्यतो खा.

१०. बाहेर असताना देखील काही अपघात होणार नाही याची काळजी घ्या आणि जास्तीत जास्त वेळ घरी थांबण्याचा प्रयत्न करून तो वेळ अभ्यासासाठी द्या.

११. शेवटचा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे परीक्षेच्या काळात योग्य प्रमाणात झोप घ्या परंतु जास्त प्रमाणात देखील झोपू नका की ज्यामुळे तुम्ही सुस्त व्हाल. जर तुम्हाला काही वाईट स्वप्न वेगळे पडलं तर अजिबात टेन्शन घेऊ नका शांत रहा आणि झोपायचा प्रयत्न करा.

आशा काय करतो की या आमच्या टिप्स तुम्हाला उपयोगी पडतील आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा!

 1,291 total views,  4 views today

Share This :

Anand Sontakke

Anand Sontakke is a Masters in International Business having 10 years experience in field of Import-Export

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *