सुषमा स्वराज – एक कणखर नेतृत्व
by Anand Sontakke · Published · Updated
सुषमा स्वराज यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९५२ रोजी हरियाणातील अंबाला कॅन्टोन्मेंट येथे हरदेव शर्मा आणि श्रीमती लक्ष्मी देवी यांच्या पोटी झाला. त्यांचे वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक प्रमुख सदस्य होते. त्यांचे आई-वडील पाकिस्तानातील लाहोरच्या धरमपूर भागातून भारतात स्थायिक झाले.
स्वराज यांचे शिक्षण अंबाला छावणीतील सनातन धर्म महाविद्यालयात झाले. संस्कृत व राज्यशास्त्रातून पदवी प्राप्त केली. त्यांनी पंजाब विद्यापीठ, चंदीगड येथे कायद्याचा अभ्यास केला. सुषमा स्वराज हया राजकारणी,सर्वोच्च न्यायालयाच्या माजी वकील होत्या. त्या भारतीय जनता पाटी च्या एक वरिष्ठ नेत्या असून २६ मे २०१४ पासून भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून कार्यरत होत्या. इंदिरा गांधी नंतर पद घेणाऱ्या त्या दुसऱ्या महिला होत्या. १९७७ मध्ये २५ वर्षांच्या वयात त्या भारताच्या उत्तरेकडील राज्य असणाऱ्या हरियाणा तील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री बनल्या. त्या संसदे चे सदस्य म्हणून सात वेळा आणि विधानसभेच्या सदस्य म्हणून तीन वेळा निवडून आल्या होत्या .
७०च्या दशकात स्वराज या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत दाखल झाल्या. १३ जुलै १९७५ ला आणीबाणीच्या काळात त्यांनी स्वराज कौशल याच्याशी विवाहबद्ध झाल्या. घरून विरोध असल्याकारणाने त्यांनी त्यांच्या पतीचे नावच आडनाव म्हणून लावायला सुरुवात केली. त्यांचे पती स्वराज कौशल हे समाजवादी नेते होते. ते जॉर्ज फर्नांडिस यांच्या जवळचे होते. त्यामुळे १९७५मध्ये स्वराज या सुद्धा फर्नांडिस यांच्या आंदोलनाशी जोडल्या गेल्या. आणीबाणीच्या काळात त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती आंदोलनात सहभाग घेतला होता. आणीबाणी नंतर त्या जनता पार्टीत सहभागी झाल्या. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिली केली होती. २००९मध्ये त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या म्हणूनही काम पाहिलं. त्या भाजपच्या पहिल्या महिला प्रवक्ता होत्या .भाजपच्या त्या दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या .

२०००-२००३ मध्ये त्यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून काम पाहिलं .२००३-२००४मध्ये त्यांनी आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री म्हणून काम पाहिलं .२००९-२०१४मध्ये त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या म्हणून काम पाहिलं .२०१४मध्ये त्यांनी नरेंद्र मोदी सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून काम पाहिलं .
२०१४-२०१९ या काळात परराष्ट्र मंत्री म्हणून काम पाहताना त्यांनी बऱ्याच देशांबरोबरच भारताशी असलेले संबंध सुधारले होते. तसेच “ट्विटर” या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी भारताबाहेर विविध कारणांनी अडकलेल्या लोकांना सुखरूपरित्या मायदेशात आणले होते. येमेन मधील संघर्षाच्या काळात त्यांनी ४७४१ भारतीयांसोबत ४८ देशातील १९४७ परदेशी नागरिकांची देखील सुटका करून त्यांना आपल्या मायदेशात पाठवले.
त्यांनी बहुतांश वेळा ट्विटरवर आलेल्या तक्रारींची वैयत्तिकरित्या दखल घेऊन त्यांना आपल्या देशा-परदेशातील कार्यालयाद्वारे वेळोवेळी मदत केली. दुबईमध्ये मानवीतस्करांच्या तावडीत सापडलेल्या एका मुलीची सुटका तसेच जर्मनीत केलेली महिलेला मदत. पाकिस्तानात वाढलेल्या मूकबधिर गीताला त्यांनी पुन्हा भारतात आणलं आणि भारतातून पाकिस्तानी मुलाला त्याच्या घरी जाण्यास केलेली मदत अशा अनेक जणांना त्यांनी मदत करून परराष्ट्र मंत्रालयाला एक मानवी चेहरा दिला.
इतकंच नव्हे तर कित्येक पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ मेडिकल विजा देखील देऊ केला. त्यांचे हजरजबाबी ट्विट्सदेखील बरेच वायरल झाले होते. काही लोकांनी त्यांना आपल्या घरातल्या फ्रिज आणि गाडीबद्दलच्या तक्रारींना त्यांनी हसत खेळात उत्तरे देऊन लोकांचीही मने जिंकली.
कलम ३७० आणि ३५ ए रद्द झाल्याची माहिती मिळताच त्यांनी पंतप्रधानांचे ट्विटच्या माध्यमातून कौतुक केले आणि त्यात ते म्हणाल्या “प्रधान मंत्री जी – आपका हार्दिक अभिनन्दन. मैं अपने जीवन में इस दिन को देखने की प्रतीक्षा कर रही थी. ” आणि लगेचच काही वेळात त्यांचे निधन झाले. जणू काही ते ह्या बातमीच्या प्रतीक्षेत त्यांनी मृत्यालादेखील रोखून धरलं होत.
६ ऑगस्ट २०१९ ला सुषमा स्वराज यांनी अखेरचा श्वास घेतला.
भारतीय राजकारणातील एका कणखर नेतृत्व आज आपण मुकलो, मा. सुषमा स्वराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली . ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.