सावित्रीबाई फुले – पहिल्या महिला शिक्षिका

Savitribai Jyotiba Phule
Savitribai Jyotiba Phule

जन्म

भारतातील प्रथम शिक्षिका होण्याचा मान मिळवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज स्मृतिदिन. सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे आणि आईचे नाव लक्ष्मीबाई नेवसे होते.

ज्योतिराव फुलेंबरोबर विवाह

वयाच्या नवव्या वर्षी त्यांच्या विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. सासरी येताना त्या ख्रिश्चन मिशनरीने दिलेला पुस्तक घेऊन आल्या. त्यावरूनच ज्योतिराव फुले यांना शिक्षणाचा नवा मार्ग सापडला. ते स्वतः शिकून सावित्रीबाईंना पण शिकवू लागले. महात्मा फुले यांची मावस बहीण सगुणा एका इंग्रज अधिकाऱ्याच्या घरी मुलाच्या दाई म्हणून काम करत होते म्हणून त्यांना इंग्रजी थोडाफार समजायचं, सावित्रीबाई आणि सगुणाई एकत्रित शिक्षण घेऊ लागल्या.

मुलींची पहिली शाळा

१ मे १८४७ रोजी सगुणाई हिला हाताशी धरून मागास वस्तीत शाळा काढली, परंतु काही काळातच शाळा बंद झाली. मग पुन्हा १ जानेवारी १८४८ रोजी भिडेवाड्यात ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची शाळा काढली. ज्या काळात स्त्रियांना घरातून बाहेर पडणं पण कठीण होतं त्यावेळी सावित्रीबाई फुले यांनी विवाहानंतर शिक्षण घेतले. शिक्षक आणि मुख्याध्यापक बनून मुलींसाठी शाळा काढली. रस्त्यावरून जाताना काही कर्मठ विचारांची लोक शेण आणि दगडांचा मारा करत. तरीही सावित्रबार्इंनी आपलं कार्य थांबविले नाही. जाताना ते सोबत एक जोडी कपडा घेवून जात आणि शाळेतच बदलत असतं. अनेक संघर्ष करत त्यांनी आपला शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच ठेवला.

शिक्षणेतर समाजकार्य

त्यांचं कार्य फक्त मुलींच्या शिक्षणापुरता मर्यादित नसून त्यांनी अनेक क्रूर रूढींनाही आळा घातला. बाला-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली अवघ्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. त्याकाळी विधवा-पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. एकतर सती जाणे किंवा मग त्यांचे केशवपन करणे एवढे दोनच उपाय त्यांच्याकडे असत. अशातच जर काही विधवा गरोदर राहिल्या तर समाजाचा छळ करणार आणि येणाऱ्या अपत्याला देखील यातना मिळणार, म्हणून बऱ्याच या विधवा आत्महत्या किंवा भ्रूणहत्या करत.

याकरिता १८६४ साली अशा विधवांकरिता गृह सुरू केले आणि सावित्रीबाई फुले यांनी ते समर्थपणे चालविले. या गृहातील अनाथ बालकांना त्या आपलीच मुले मानत आणि इथेच असलेल्या एका विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन त्यांनी त्यांचे नाव यशवंत ठेवले. त्यांनीं केशवपन या अमानवी रुढीविरुद्ध देखील आवाज उचलला, त्यांनी सर्व स्त्रियांना एकत्रित करून नाव्ह्यांचे प्रबोधन करून संपदेखील घडवून आणला. याचबरोबर त्यांनी विधवा पुनर्विवाह कायद्यासाठी देखील प्रयत्न केले.

१८७६-७७ च्या दुष्काळात त्यांनी अनेकांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या या कार्याला हातभार लागावा म्हणून पंडिता रमाबाई आणि गायकवाड सरकार यांनी मदतीचा हात पुढे केला.

महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा सहभाग होता. १८९० मध्ये महात्मा फुले यांच्या निधनानंतर त्यांनी या कार्याची धुरा समर्थपणे वाहिली. विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी साहित्याचा आधार घेतला.

काव्यसंग्रह

सावित्रीबाई फुले यांनी काव्यफुले, सावित्रीबाईंची गाणी, बावनकशी, सुबोध रत्नाकर आदी काव्यसंग्रह लिहिली. तsसेच आपल्या नायगाव या गावावर देखील कविता लिहिली आहे.

मृत्यू

१८९७ मध्ये पुण्यात प्लेगची साथ आली. अशा प्लेगच्या रुग्णांची सेवा करताना १० मार्च १८९७ मध्ये त्यांचा प्लेगने मृत्यू झाला.

अशा या महान शिक्षिकेस आमचा मानाचा मुजरा!

 887 total views,  2 views today

Share This :

Anand Sontakke

Anand Sontakke is a Masters in International Business having 10 years experience in field of Import-Export

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *