स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाबाई – परिचय

Rajmata Jijaju

राजमाता जिजाबाई यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड झाला. जिजाबाईंच्या वडिलांचे नाव लखुजी जाधव आणि आईचे नाव म्हाळसाबाई होते. सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. जिजाबाईंनी राजनीती आणि युद्धकलेचे शिक्षण घेतले.

जिजाबाई यांचा विवाह भोसले घराण्यातील शहाजीराजांशी इसवी सन १६०५ मध्ये दौलताबाद येथे झाला.

भोसले व जाधव यांचे वैर संपुष्टात

भोसले कुटुंबीय आणि जाधव कुटुंबीय यांच्यात एका पिसाळलेल्या हत्तीला पकडण्यावरुन भांडण झाले. त्यांच्यातच दोन गट पडले एक भोसले कुटुंबियांचा गट त्याचे नेतृत्व शहाजीराजांचे थोरले बंधू शरीफजीराजे भोसले करीत होते. तर जाधव कुटुंबियाच नेतृत्व जिजाबाई यांचे थोरले बंधू दत्तोजीराजे जाधव करत होते. संभाजी राजे भोसले यांनी दत्तोजीराजे जाधव यांना ठार केले, हे समजताच लखुजीराजे जाधवांनी संभाजीराजे भोसले यांना ठार केले. शहाजीराजे भोसले देखील आपल्या सासऱ्याच्या अंगावर धावून गेले. याक्षणी देखील जिजाबाई आपल्या पतीच्या पाठीशी राहून आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहिल्या.

धैर्य, शौर्य, दूरदृष्टी, प्रचंड आत्मवश्वास आणि इच्छाशक्ती अशा विविध गुणांनी परिपूर्ण असलेल जिजाऊसाहेबांचे व्यक्तिमत्व होते.

एकदा आदिलशाहने लखुजीराजे जाधवांना शहाजीराजे भोसले यांना कैद करायला पाठिविले. जिजाजू त्यावेळी गरोदर असल्याकारणाने शिवनेरी किल्ल्यावरच होत्या. अशावेळी लाखोजीराजे जाधव आपल्या लेकीला भेटले, परंतु त्यावेळी देखील जिजाजूसाहेबांनी आपल्या वडिलांस पातशाहाजी चाकरी करून फक्त जहागिरी आणि वतनदारीसाठी मराठा आपापसात भांडण तंटे करून, एकमेकास मारून जगण्यापेक्षा स्वतःच्या मुलुखाचं रक्षण करण्याचा सल्ला दिला. लाखोजी जाधवांनादेखील हि गोष्ट समजल्यावर त्यांनी भोसले कुटुंबियांबरोबरच वैर संपवून टाकत शहाजीराजेंचे भेट घेतली.

जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. मोठा मुलगा संभाजी ज्याचे नाव आपल्या मृत दिरच्या नावावर ठेवण्यात आले. तो शहाजीराजांजवळ वाढला. त्यानंतर त्यांना चार मुले झाली चारही दगावली. सात वर्षाचा काळ निघून गेला शनिवार दिनांक १७ एप्रिल १६२७ ला शिवनेरी किल्ल्यावर दुसऱ्या मुलाचा जन्म झाला. मुलाचे नाव शिवाजी ठेवले आणि त्याची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंनी आपल्या खांद्यावर घेतली.

मराठी मुलुख

शिवाजी राज्यांच्या जन्मावेळी लोकांची असलेली परिस्थिती फार विदारक होती. मुघल, आदिलशाह आणि निजामशहा याच्या सैनिकांकडून होणारे अत्याचार, देवी देवतांच्या मूर्तीची आणि मंदिराची विटंबना, तसेच या अत्याचारापासून वाचण्यासाठी धर्मांतरण इत्यादी ना ना कारणाने संपूर्ण मराठा मुलुख गांजला होतो. स्त्रियांची अब्रू वेशीवर टांगली जात होती.

जिजाबाईंनी शिवाजीराजांना पहिल्यापासूनच रामायण, महाभारतातील गोष्टी सांगून, सत्य-असत्य, धर्म-अधर्म आणि पारतंत्रात असल्याची जाणीव करून दिली. जिजाऊच्या या संस्कारामुळे शिवाजी राजे घडले.

शहाजीराजे सतत मोहिमेवर असल्याकारणाने जिजाऊंनी आई-वडिलांची दुहेरी कामगिरी अत्यंत चोखपणे पार पाडली. रामायणात सीतेचे हरण झाल्यावर रामाने केलेला रावणाचा वध, तसेच महाभारतातील असलेला सत्तेसाठीचा संघर्ष. दुबळ्या लोकांना वाचविण्यासाठी भीमाने केलेला बकासुराच्या वध इत्यादी गोष्टी सांगून शिवरायांना येणाऱ्या प्रसंगासाठीची तयारी करून घेत. फक्त स्वतःच्या वतनाचा विचार न करता संपूर्ण प्रजेला न्याय देण्यासाठी शिवरायाच्या मनात स्वराज्याची कल्पना रुजविणाऱ्याऱ्या देखील राजमाता जिजाऊसाहेबच.

पुण्यातील राज्यकारभार

शिवाजीराज्यांच्या जन्मानंतर शहाजी राजांनी जिजाबाईकडे पुण्यातील जहागिरी सुपूर्त केली. त्यावेळी पुण्याची अवस्था फार दनानिय होती. तिथे सोन्याचा नांगर फिरवून राज्यकारभाराची घडी बसविली.

जिजाबाई राज्यकारभारात स्वतः जातीने लक्ष घालत. प्रसंगी न्यायनिवाडा करत. जिजाबाई शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वत: बारकाईनं लक्ष ठेवलं. छत्रपती शिवराय लहानाचे मोठे आपल्या आईच्या छत्रछायेखाली झाले. शिवरायांची संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली. सद्गुणांची आणि विचाराची दूरदृष्टी शिवाजीराजांना जिजाऊंकडूंच मिळाली.

शहाजीराजांची कैद व सुटका, अफझलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाऊंचे मार्गदर्शन लाभले.

जिजाऊंचे राज्यकारभारावर बारीक लक्ष असत. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली. महाराजांच्या सर्व स्वार्‍यांचा लढायांचा तपशील त्या ठेवत असत राजांच्या गैरहजेरीत स्वत: राज्याची धुरा वाहत असत. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना संपूर्ण राज्याची जबाबदारी त्यांनी उतारवयात मोठ्या कौशल्याने निभावून नेली. न्याय करताना समान करावा व अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शासन करावे, ही शिकवण देणाऱ्या देखील जिजाऊसाहेब.

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर १७ जून १६७४ ला रायगडाच्या पायथ्याशी पाचाड या गावी शेवटचा श्वास घेतला. छत्रपती शिवाजीराजांचा राज्याभिषेक होण्यासाठीच जणू त्यांनी प्रतीक्षा केली होती.

अशा या राजमाता जिजाऊंना आमचा मानाचा मुजरा!

 963 total views,  3 views today

Share This :

Anand Sontakke

Anand Sontakke is a Masters in International Business having 10 years experience in field of Import-Export

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *