लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

केशव उर्फ बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म २३ जुलै टिळक आळी, रत्नागिरी येथे एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला. चिखलगाव हे त्यांचे मुळ गाव. त्याच्या वडिलांचे नाव गंगाधर रामचंद्र टिळक व आईचे नाव पार्वतीबाई टिळक.

त्यांच्या वडिलांची बदली पुणे येथे झाल्यानंतर १० वर्षाच्या टिळकांचे पुढील शिक्षण देखील पुणे येथे झाले. टिळकांना अन्यायाविरुद्ध चिड होती. त्यांच्यात कणखर बाणा आणि बंडखोर वृत्ती लहानपणापासून दिसत होती. याचीच एक झलक त्यांनी शाळेत असताना दाखवून दिली. एकदा त्यांच्या शिक्षकांनी त्यांना वर्गातील शेंगाची टरफल उचलण्यास सांगितली तेंव्हा त्यांनी आपल्या करारी शब्दात “मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफल उचलणार नाही” असे ठणकावून सांगितले.

टिळकांच्या लहान वयातच आईचे छत्र हरवले व टिळक सोळा वर्षाचे असताना वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचे काका गोविंदपत यानी टिळकांचा सांभाळ केला. त्यांनी नेहमीच टिळकांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. मुत्यूपुर्वी त्यांनी टिळकांचा विवाह सत्यभामाबाई ऊर्फ तापीबाई याच्यासोबत लावुन दिला.

पुणे येथे त्यांना अनेक प्रसिद्ध शिक्षकांच्या हाताखाली शिकण्याची संधी मिळाली ज्याचा त्यांच्या आयुष्यावर खूप प्रभाव पडला. १८७२ ला ते मॅट्रिकची परीक्षा पास झाले आणि १८७७ मध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून बी.ए. ची पदवी मिळवली. त्यांनतर उच्च शिक्षणासाठी एल.एल.बी शाखेची निवड केली. इथेच त्यांची ओळख गोपाळ आगरकर यांच्याशी झाली आणि त्या ओळखीचे घट्ट मैत्रीत रूपांतर झाले.

त्याकाळी असलेल्या ब्रिटिश शाळातील शिक्षण पद्धतीने आपल्याला कधीच स्वातंत्र मिळणार नाही असे लक्षात आल्यावर त्यांनी विष्णूशास्त्री चिपळूणकर ,टिळक व आगरकर यांनी १ जानेवारी १८८० रोजी पुणे येथे ‘न्यू इंग्लिश स्कुलची स्थापना केली. टिळक व आगरकरांनी २४ ऑक्टोबर १८८४ रोजी पुणे येथे ‘डेक्कन एजुय्केशन सोसायटी’ ची स्थापना केली. पुढे काही महिन्यांनी २ जानेवारी १८८५ रोजी या संस्थेच्या वतीने’ फर्ग्युसन कॉलेज’ सुरू करण्यात आले. या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट फक्त शिक्षण देणे नसून तर राष्ट्रवादाचा विचार करणारी पिढी तयार करणे असंही होत. मातृभाषेतील शिक्षणाला त्यांचा पाठिंबा होता.

टिळक व आगरकर यांनी मिळून इग्रंजी भाषेत ‘मराठा’ व मराठी भाषेत ‘केसरी’ ही वृत्तपत्रे सुरू केली. पुढे स्वातंत्र आधी कि सामाजिक सुधारणा विषयावरून आगरकर आणि टिळक यांच्या मतभेद झाले आणि आगरकरांनी केसरीच्या संपादकपदाचा राजीनामा दिला. परंतु आपल्या कार्यापासून मागे न पडत टिळकांनी संपादकपदाची धुरा सांभाळून आपल्या राष्टीय विचारांचा प्रचार व प्रसार सुरूच ठेवला. त्यांच्या केसरीतील अग्रलेखात त्यांनी “या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?” असे विचारात ब्रिटिशांवर सडकून टीका केली. पुण्यात प्लेग रोगाची साथ आल्यावर सरकारी अधिकाऱ्यांनी मदत करण्याऐवजी लोकांवर अत्याचार करण्यास सुरवात केली त्याविरोधातदेखील टिळकांनी आपल्या वृत्तपत्रातून समाचार घेतला.

१८९३ साली टिळक यांनी घराघरात साजरा होणाऱ्या गणेशोत्सव उत्सवाला सार्वजनिकरित्या साजरा करण्यास सुरुवात केली. तसेच १८९६ साली पहिला शिवजयंती उत्सव त्यांनी रायगडावर साजरा केला. या उत्सवांच्या निमित्ताने लोकांना एकत्र आणून ब्रिटिशांविरुद्ध व्यासपीठ उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली.

१८९० मध्ये टिळक भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये सामील झाले आणि ते स्वातंत्र्य चळवळीचा भाग बनले. त्याचा मुख्य उद्देश ब्रिटिशांविरुद्ध संघटित करणे हा होता. स्वातंत्र्यासाठी जनतेला उठवण्यातील यशस्वी प्रयत्नांबद्दल त्यांना ‘भारतीय अशांती चळवळीचे जनक’ म्हणून ओळखले जाऊ लागले. टिळकांनी नेहमीच जहाल मतवादी विचारांचा पुरस्कार केला. लोकांनी फक्त सनदशीर मार्गाने जाऊन तसेच अर्ज विनंत्या करून आपल्याला हाती काही लागणार नाही अशी त्यांची ठाम भावना होती. तसेच ब्रिटिशांच्या न्याय व्यवस्थेवर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता. फक्त मवाळ न राहता वेळप्रसंगी ब्रिटिशांशी दोन हात करण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे असे त्यांचे स्पष्ट मत होते. यामुळे राष्ट्रीय काँग्रेसमध्ये मवाळवादी आणि जहालवादी असे दोन गट पडले. त्यातील जहाल मतवादी गटाचे नेतृत्व टिळकांनी केले.

बाळ गंगाधर टिळक हे लाला लजपत राय आणि बिपिन चंद्र पाल या जहाल मतवादी नेत्यांचे त्रिकुट एकत्रितरित्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढू लागले. बंगालच्या फाळणीचा त्यांनी जोरदार विरोध करत त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध आंदोलन, विदेशी वस्तुंवर बहिष्कार टाकत त्यांचे लोण देशातील इतर भागात पोहोचवले. तसेच प्रफुल्ल चाकी आणि खुदिराम बोस यांनी केलेल्या बॉम्ब हल्ल्याचे त्यांनी समर्थन केले.

यामुळेच राष्ट्रद्रोहाचा कलमाखाली ब्रिटिशांनी त्यांना अटक केली आणि १९०८ ते १९१४ च्या सुमारास बाल गंगाधर टिळक यांना मंडाले कारागृहातील बर्मामधील सहा वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली होती. याच कारावासात असताना त्यांनी “गीता रहस्य” हा ग्रंथ लिहिला. त्याच्या प्रति विकून आलेला पैसादेखील त्यांनी स्वातंत्र्याच्या कार्यांत समर्पित केला.

बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी, तत्त्वज्ञ, संपादक, लेखक आणि वक्ते होते. ‘लोकमान्य’ या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो. 

“स्वराज माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच.” त्यांची हि घोषणा लोकांच्या मनात घर करून गेली.

टिळक विरुद्ध फुले आणि शाहू 

राष्ट्रवाद, स्वातंत्रासाठीची टिळकांची तळमळ, शिक्षणासाठी त्यांनी घेतलेला पुरस्कार इत्यादी गोष्टी जरी टिळकांना मोठ्या पदावर बसवत असल्या तरी त्यांच्या काही गोष्टी या न पटण्यासारख्यादेखील होत्या. राजकीयदृष्ट्या जहाल मतवादी असलेलं टिळक सामाजिकदृष्ट्या मात्र विरोधक होते. त्याकाळच्या एखाद्या कर्मठ ब्राह्मणाप्रमाणे त्यांनी शूद्रांच्या शिक्षणास विरोध केला तसेच शुद्रांनी शिक्षण न घेता आपले पारंपरिक कामच करत राहावे अशी त्यांची धारणा होती. तसेच स्त्रीशिक्षणास देखील त्यांनी आपला विरोध दर्शविला होता यामुळेच त्यांचे  त्यांनी जाती व्यवस्था बदलण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या महात्मा फुले तसेच कोल्हापूरचे राजे शाहू महाराज यांच्याबरोबर खटके उडत असत. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे आपल्या वर्णपरंपरेनुसारच सर्व काही चाललं पाहिजे असेच त्यांचे विचार होते. त्याकाळी चालत असलेल्या बालविवाह प्रथेला देखील त्यांचे समर्थन होते. 

टिळकांना मधुमेह या आजाराने त्रासले होते आणि या काळात त्याना फारच अशक्तपणा आला होता . १९२०   च्या सुमारास त्यांचं तब्ब्येत फार खालावली आणि त्याचवर्षी  १ ऑगस्ट रोजी त्यांचे मुंबईत निधन झाले. त्यांचे अंतिम संस्कार करण्यासाठी मुंबईतील चौपाटी येथे करण्यात आले. आपल्या प्रिय नेत्याची शेवटची झलक पाहण्यासाठी मुंबईत त्यांच्या निवासस्थानी २ लाखांहून अधिक लोक जमले होते.

 

Share This :

Anand Sontakke

Anand Sontakke is a Masters in International Business having 10 years experience in field of Import-Export

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *