डॉ. बाबासाहेब आंबेडकर

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपण भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री म्हणून ओळखतो. ते बौद्ध धर्म पुनरुत्थारकदेखील होते. दलितांच्या उद्धाराकरिता आणि प्रगतीसाठी आपल्या संपूर्ण जीवनाचा त्याग केला.

बाबासाहेब आणि कुटुंबीय

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी महू, इंदूर-मध्य प्रदेश येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ आणि आईचे नाव भिमाबाई. बाबासाहेबांचे वडील रामजी सकपाळ हे भारतीय ब्रिटिश आर्मीत सुभेदार होते.

सन १८९४ त्यांचे वडील आपल्या नोकरीतून निवृत्त झाले. त्यांचे संपूर्ण कुटुंब महाराष्ट्रातील सातारा स्थायिक झाल्या. भीमराव आंबेडकर हे आपल्या आई-वडिलांचे चौदाव्या आणि शेवटचे अपत्य होते.

१९०६ साली वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांचे लग्न रमाबाई सोबत झाले, परंतु १९३५ ला रमाबाई यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यानंतर १९४८ साली त्यांचा शारदा कबीर यांच्याशी दुसरा विवाह झाला.

बाबासाहेब आणि उच्च शिक्षण

बाबासाहेबांचे वडील आर्मीत असल्याकारणाने शालेय शिक्षणात त्यांना फायदा झाला. परंतु महार असल्याकारणाने त्यांना जातीनिहाय भेदभावाला सामोरे जावे लागले. त्यांना इतर उच्चवर्णीय विद्यार्थ्यांसोबत बसण्याची परवानगी नव्हती. तसेच पाणी पिण्याची देखील परवानगी नव्हती. अनेक कटू प्रसंगांना तोंड देत शिक्षण घेत होते.

१८९८ साली वडिलांनी दुसरे लग्न केल्यावर आपले कुटुंब मुंबईला नेले. येथे भिमराव यांनी एलफिन्स्टन हायस्कूलला प्रवेश घेतला आणि १९०७ साली मॅट्रिक झाले. एक दलीत विद्यार्थी मॅट्रिक झाला ह्या गोष्टीचं त्यावेळी बऱ्याच लोकांना अप्रूप वाटे. पुढील उच्च शिक्षणकरिता एलफिन्स्टन कॉलेजला ऍडमिशन घेणारे ते पहिले दलीत विद्यार्थी होते.

बडोद्याचे संस्थापक सयाजीराव गायकवाडांनी पंचवीस रुपये महिना ची फेलोशिप मिळाल्यावर ते १९१३ साली पुढील शिक्षणाकरिता अमेरिका गाठली. १९१५ साली न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठात  समाजशास्त्र, मानव विज्ञान यासोबत अर्थशास्त्रतून एम. ए. ची मास्टर डिग्री प्राप्त केली. तसेच १९१६ साली पी. एच. डी. ची पदवी घेतली.

त्यानंतर भारतात परतल्यावर त्यांनी बडोदा संस्थानात सैन्य मंत्री आणि वित्तीय सल्लागाराची जबाबदारी स्वीकारली. परंतु तिथेदेखील त्यांना जतिगत भेदभावामुळे खूप त्रास सहन करावा लागला. शेवटी त्यांनी ती नोकरी सोडून मुंबईला परतले. मुंबईत त्यांनी सिंडेहोम कॉलेज ऑफ इकनॉमिक्स येथे अर्थशास्त्राचे प्रोफेसर म्हणून काम पाहिले. 

१९२० साली पुन्हा ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलीटिकल सायन्सची पदवी घेण्यासाठी रवाना झाले. तसेच तेथे त्यांनी डी. ए. सी पदवी देखील मिळवली. न्यायशस्त्रचा अभ्यास केल्यावर त्यांनी ब्रिटिश बार मध्ये बॅरिस्टर म्हणून देखील काम केले.

१९२७ साली कोलंबिया विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट पदवी देवून त्यांचा सन्मान केला. 

बाबासाहेब आणि सामाजिक परिस्थिती

देशाबाहेरील शिक्षणानंतर भारतात परतल्यावर आपल्याला आलेले अनुभव आणि त्यावेळची सामाजिक परिस्थिती आणि दलितांवर होणारे अत्याचार, अस्पृश्यता याविरोधात लढण्याचा निर्णय घेतला.

आपल्या विचार लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी “मूकनायक” या सामाजिक पत्राची स्थापना केली.

दलितांच्या अधिकारासाठी लढताना त्यांनी सार्वजनिक पाण्याचे स्त्रोत सर्वांकरता खुले करण्यात यावे. तसेच मंदिरात सर्वजातीय लोकांना प्रवेश देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. नाशिक मधील काळाराम मंदिरात त्यांनी स्वतः प्रवेश करून त्यांनी आंदोलन सुरू केले.

डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी १८३७ ला स्वतंत्र लेबर पार्टी बनवली आणि १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यावर तिला भारतीय अनुसूचित जाती संघामध्ये परिवर्तित केली.

बाबासाहेब आणि राजकारण

डॉ. भीमराव आंबेडकरांना व्हाईसरॉय एकझिक्युटिव्ह कौन्सिल मध्ये श्रम मंत्री आणि रक्षा सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले. आणि आपल्या कार्याचा बळावर स्वतंत्र भारताचे कायदेमंत्री झाले. एक दलीत व्यक्तीने त्यावेळी मंत्री होणे हे त्याच्या आंदोलनाचे मोठे यश होते.

कायदामंत्री झाल्यावर स्वतंत्र भारताचा संविधान लिहिताना त्यांचा मूळ उद्देश देशातील जातीपातीचा भेदभाव आणि अस्पृश्यतेला मुळापासून नष्ट करणे व सर्वांना सोबत घेऊन समानतेचा अधिकार देणे हा होता.

२९ ऑगस्ट डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. जवळजवळ तीन वर्षाच्या अथक परिश्रमाने आंबेडकरांनी समता, समानता, बंधुता आणि मानवतेवर आधारित संविधान तयार करून तेव्हाचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सपूर्त केले.

संविधानाची निर्मिती व्यतिरिक्त त्यांनी भारताच्या वित्त आयोगाची स्थापना करण्यात देखील महत्त्वाची भूमिका बजावली.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध धर्म

१९५० साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका बौद्ध संमेलनात सहभागी होण्यासाठी श्रीलंकेला गेले. तिथे बौद्ध धर्मातील विचारांनी ते एवढे प्रभावित झाले की त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला व स्वतःला बौद्ध धर्मात रुपांतरित केले.

भारतात परतल्यावर त्याने बौद्ध धर्माविषयी बराच अभ्यास करून अनेक पुस्तके लिहिली. हिंदू धर्मातील काही चालीरीतींच्या ते विरोधात होते.
१९५५ झाली भारतीय बौद्ध महासभेचे स्थापना त्यांनी केली.

१४ ऑक्टोबर १९५६ ला नागपूर येथे आपल्या जवळपास ५ लाख अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली.

६ डिसेंबर १९५६ मधुमेह आणि इतर आजारांमुळे त्यांनी आपल्या दिल्लीतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.

भारत सरकारने १९९० साली त्यांना मरणोत्तर “भारतरत्न” हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देवून सन्मानित केले.

अशा या महामानवाला आमचे विनम्र अभिवादन!

141 total views, 3 views today

Share This :

Anand Sontakke

Anand Sontakke is a Masters in International Business having 10 years experience in field of Import-Export

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *