एक आवाहन – गाढी नदी संवर्धनाचं

गेले काही आठवड्या पासून निसर्गमित्र मध्ये एक चळवळ सुरू झालीये. ती म्हणजे गाढी नदी स्वच्छ करायची आणि पुनर्जीवीत करायची. त्रैमासिक सभेत श्रमदान हा विषय सर्वांचा खूप आवडता आणि उत्स्फुर्त प्रतिसाद मिळवणारा. निसर्गमित्र चा प्रत्येक कार्यकर्ता श्रमदाना साठी तयार असतो. (मी सुद्धा काही श्रमदानांचे नेतृत्व केलय म्हणून माझा हा अनुभव आहे)

या त्रैमासिक सभेत गाढी नदी स्वच्छ करायची असे सगळ्यांचे एक मत होते आणि त्यात सगळ्यांनी सहभाग ही दाखवला. यासाठी वेगळ्या 2 मिटिंग झाल्या. नदी ची 3 ते 4 वेळा पाहणी सुद्धा करण्यात आली. यात असे लक्षात आले की नदी मध्ये बऱ्याच प्रमाणात प्लास्टिकचा कचरा आहे. नदीचा कचरापेटी सारखा वापर होतोय. नदी लगत असलेल्या बिल्डिंग चे ड्रेनेज पाप नदीत सोडले गेकार्य कार्य संस्था करतसंस्था करतसंस्था करतसंस्था करतसंस्था कत म्हणजे तिचे गटारा रूपांतर व्हायला आणखी मदत, असे या मोहिमेत सहभागी व्हावेया मोहिमेत सहभागी व्हावेया मोहिमेत सहभागी व्हावेया मोहिमेत सहभागी व्हा या मोहिमेत सहभागी व्हावेया मोहिमेत सहभागी व्हावेया मोहिमेत सहभागी व्हावेया मोहिमेत सहभागी व्हावेया मोहिमेत सहभागी व्हावेया मोहिमेत सहभागी व्हावेया मोहिमेत सहभागी व्हावेया मोहिमेत सहभागी व्हावेया मोहिमेत सहभागी व्हावेया मोहिमेत सहभागी व्हावेया मोहिमेत सहभागी व्हावेया मोहिमेत सहभागी व्हावे वेया मोहिमेत सहभागी व्हावे बऱ्याच गोष्टी निदर्शनास आल्या.

हे खर म्हणजे एकट्या दुकट्या संस्थेचे काम नाही आहे. यात खूप मनुष्य बळ, प्रशासन (महानगरपालिका) व सगळ्यात महत्वाचे तिथे आजूबाजूला रहाणाऱ्या लोकांची मदत लागणार आहे. या लोकांना कचरा कुंड्या उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. प्रत्येक सोसायटी मध्ये फिल्टरेशन प्लान्ट कंपल्सरी केले पाहिजेत. जेणे करून नदी मध्ये सांडपाणी जाणार नाही. नदीच्या आजू बाजूला झाडे लावली गेली पाहिजे ज्यामुळे नदी वाहती राहील.

निसर्ग मित्र ने संत गाडगे बाबा यांचा आदर्श समोर ठेवला आहे. कोणी येईल न येईल आपण सुरवात करूया. नदीचे पात्र स्वच्छ करुया. 1 मे ला पहिली स्वछता मोहीम झाली आणि ती एवढी प्रभावी होती की त्याला सोशल मीडिया, वर्तमानपत्र, वृत्तवाहिन्या यांच्यावर चांगला कव्हरेज मिळाला. ते पाहून खूप लोकांनी विचारले, की आम्हाला पण या मोहिमेत सहभागी व्हायचंय. त्यामुळे लगेचच 5 मे ला दुसरी मोहीम आखली यात खूप लोक येणार या दृष्टी ने 4 टप्यात वेगळे समूह करून कामाची वाटणी करून घेतली. त्यालासुद्धा चांगले यश मिळाले.

आता जनजागृती
लोकांना नदी चे महत्व समजावून दयायचे. नदी चे फायदे त्यात कचरा टाकल्याने होणारे तोटे, पसरणारी रोग राई, निळ्या पाण्या ऐवजी दिसणारे काळे पाणी अगदी गटारा सारखे. याला आळा घालणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे हे प्रत्येक आजू बाजूच्या गावा गावात पटवून द्याचे. फायदा हा प्रत्येकाला होणार अगदी निसर्गाला ,प्राणी ,पक्षांना सुद्धा आणि पुढच्या पिढी ला सुद्धा.

आपल्या सगळ्यांना निसर्ग मित्र कडून आवाहन आहे या मोहिमेत सहभागी व्हा. अगदी श्रमदाना ला नाही येऊ शकलात तरी जनजागृती साठी लोकांना नदी चे महत्व पटून देण्या साठी. नदी च्या बाजूला झाडे लावण्या साठी ती जगवण्या साठी, प्रशासनाला नदी कडे लक्ष घालण्या करीत भाग पडण्या साठी नक्की या.

आपली थोडी मदत एक नदी ला परत स्वच्छ पाण्याने वाहती करू शकते.

सर्वांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचवून त्यांना ह्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करा.

अधिक माहितीसाठी संपर्क

सचिन शिंदे – ९८३३०९७२००
अक्षय गायकर – ९६९९५५४६४९

www.nisargamitrapanvel.com

Join our Whatsapp Group – https://chat.whatsapp.com/BUs90rouFeO79G3kkEhvmM

 735 total views,  3 views today

Share This :

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *