महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि माहिती

Maharashtra Din
Maharashtra Din

मुंबई राज्य

महाराष्ट्राच्या नकाशात मुंबई नसेल तर कसं वाटेल? अशीच काहीही परिस्थिती १९३० ते १९६० पर्यंत होती, जेव्हा महाराष्ट्र राज्य जेव्हा अस्तित्वात नव्हत. तेव्हा मुंबई हेच स्वतंत्र राज्य होत.

भारत स्वतंत्र होण्यापूर्वी इंग्रजांनी आपल्या कारभारासाठी प्रांतवार रचना केली होती, परंतु ती रचना भाषानिहाय नव्हती. १९२० च्या नागपूर येथील काँग्रेस अधिवेशनात महात्मा गांधींना भाषावर प्रांतरचना करण्याचा मुद्दा मांडला होता. लोकमान्य टिळकांची देखील हीच इच्छा होती.

परंतु भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंडित नेहरूंना हे काही रुचले नाही, तसेच मुंबईतील बऱ्याच या अमराठी भांडवलदारांना मुंबई महाराष्ट्राला द्यायला कडाडून विरोध होता.

संयुक्त महाराष्ट्र समिती

भारत स्वतंत्र होण्याच्या आधीपासूनच संयुक्त महाराष्ट्राचा विषय जनतेपुढे मांडण्यात आला होता. त्यासाठी “संयुक्त महाराष्ट्र समिती” स्थापन करण्यात आली होती.

१९४८ साली दार कमिशनने आपल्या अहवालात भाषावार प्रांतरचनेच्या विरोध करून महाराष्ट्रातील लोकांवर अपमानास्पद टिप्पणी केली. जे. वी. पी. कमिटीने देखील मुंबईसह महाराष्ट्राच्या मागणीला विरोध केला.

१९५३ मध्ये फाजल अली याच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची नियुक्ती झाली. परंतु त्यातदेखील महाराष्ट्रावर अन्याय झाला. हैदराबादसाठी एक भाषिक राज्य तर मुंबई मात्र द्वैभाषिक आणि मराठी भाषिक बेळगाव मात्र कर्नाटकात अशी विसंगती होती.

या आयोगाच्या विरोधात महाराष्ट्रभर असंतोष उसळला, सौराष्ट्रासह गुजरात, विदर्भासह महाराष्ट्र आणि स्वतंत्र मुंबई अशा तीन राज्याची योजना नेहरूंनी केली. परंतु मुंबई महाराष्ट्रातून तोडल्यामुळे संयुक्त महाराष्ट्र चळवळीने पेट घेतला.

महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांनी दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वापुढे गुडघे टेकले. महाराष्ट्रातील काँग्रेसतर पक्षातील पुढाऱ्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा हातात घेतला सेनापती बापट, डॉ बाबासाहेब आंबेडकर, एस एम जोशी, आचार्य अत्रे, श्रीपाद डांगे, शाहीर अमर शेख, प्रबोधनकार ठाकरे इत्यादींनी ह्या लढ्यात सहभाग घेतला.

१०६ हुतात्म्यांच बलिदान

२० नोव्हेंबर १९५५ चौपाटीवर झालेल्या सभेमध्ये हे मोरारजी देसाई आणि स. का. पाटील यांनी प्रक्षोभक भाषणे करून मराठी जनतेचा अपमान केला. लोकांनी ती सभा उधळून लावली.

१९५६ च्या सुरुवातीला मुंबई केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषणा केल्यानंतर आंदोलक रस्त्यावर उतरले आणि सत्तेचा दुरुपयोग करत मोरारजी सरकारने गोळीबाराचा आदेश देवून अनेक आंदोलकांचे प्राण घेतले. एकूण १०६ हुतात्म्यांना बलिदान द्यावे लागले. या घटनेनंतर नेहरूंना महाराष्ट्रात तीव्र विरोध होऊ लागला आणि तत्कालीन अर्थमंत्री सी. डी. देशमुखांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे या आंदोलनाला बळ मिळाले.

१९५७ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात काँग्रेसला आपल्या बऱ्याच जागा गमवाव्या लागल्या. नेहरूंना ठिकठिकाणी काळे झेंडे दाखवण्यात आले. त्यामुळे नेहरूंना मराठी जनतेच्या तीव्र भावनेची दखल घ्यावी लागली.


महाराष्ट्र राज्य

१ मे १९६० रोजी द्वैभषिक मुंबई राज्याची विभागणी होऊन महाराष्ट्र व गुजरात अशी दोन राज्ये अस्तित्वात आली. अशाप्रकारे तमाम मराठी जनतेच्या मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार झाले.

दरवर्षी १ मे हा दिवस महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस “महाराष्ट्र दिन” म्हणून साजरा केला जातो या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते हा दिवस मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात विविध कार्यक्रमांचे आयोजन या दिवशी केली जाते महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण केले जाते.

आजही पुन्हा आपण तशीच परिस्थिती तर निर्माण नाही करत आहोत ना याचा मराठी माणसांनी विचार केला पाहिजे. मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होत चालला आहे. मराठी पालक आपल्या पाल्याला इंग्रजी शाळेत टाकत आहेत. तसेच महाराष्ट्रात राहूनही आपण परप्रांतातील लोकांची मराठी ऐवजी हिंदी मध्ये संवाद साधत आहोत.

आजही पुन्हा तशीच परिस्थिती आपण निर्माण तर करत नाही ना याची सर्वांनी जाणीव ठेवावी. मुंबईसाठी बलिदान देणाऱ्या त्या १०६ हुतात्म्यांच स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करू. १९६५ ला फ्लोरा फॉऊंटनला हुतात्मा स्मारक बांधण्यात आलं.

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आंतरराष्ट्रीय कामगार दिन

तसेच एक मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो औद्योगिक क्रांती संपल्यानंतर कामगारांना रोजगार मिळू लागला परंतु त्यांची पिळवणूक होत होती कोणत्याही सुविधा न देता अल्प मजुरी देऊन १२ ते १४ तास काम करून घेत याविरोधात कामगार एकत्र आले व कामगार संघटनेची निर्मिती झाली प्रत्येक काम करावे ठराव करण्यात आला म्हणून एक मी हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

 1,173 total views,  2 views today

Share This :

Anand Sontakke

Anand Sontakke is a Masters in International Business having 10 years experience in field of Import-Export

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *