जागतिक महिला दिन विशेष आणि भारतातील थोर महिला

Happy Women’s Day

भारतातील आणि जगभरातील तमाम स्त्रीवर्गाला जागतिक महिला दिनानिमित्त मानाचा मुजरा!

महिला दिनाची सुरुवात

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला तरी १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.

भारतातील महिला दिन

एकोणिसाव्या शतकात जगभरातील स्त्रीवादी चळवळ जोर धरला होता त्याच वेळी भारतातही अनेक समाजसुधारकांनी स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली ज्यामध्ये राजा राम मोहन राय, महर्षी कर्वे, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले, ईश्वरचंद्र विद्यासागर, रमाबाई रानडे ही नावे विसरून चालणार नाहीत. सतीप्रथा, केशवपन, बालविवाह अशा अनेक वाईट प्रथा बंद करण्याचे यशस्वी प्रयत्न झाले. स्त्रीशिक्षण आणि विधवा पुनर्विवाह असे विषय समाजासमोर मांडण्यात आले त्याचेच परिणाम म्हणून विवाहाच्या वेळी मुलांचे किमान वय सोळा ते अठरा मुलींचे किमान वय दहा ते बारा असावे अशी तरतूद करण्यात आली तसेच स्त्री शिक्षणाच्या चळवळीने जोर धरला.

महाराष्ट्रात महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतातील पहिली स्त्री शिक्षिका होण्याचा मान मिळवलेल्या त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांचे योगदान फार मोठे आहे. समाजाचा प्रखर विरोध व त्यातून निर्माण झालेल्या अडचणींना तोंड देत या पती-पत्नीने शिक्षणाचा पाया महाराष्ट्र घातला. स्त्रिया विविध सामाजिक राजकीय धार्मिक विषयांमध्ये सहभागी होऊन आपले मत व्यक्त करू लागले.

भारतामध्ये सन १९०२ रोजी रमाबाई रानडे यांनी हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लब ची स्थापना केली तर १९०४ मध्ये भारत महिला परिषदेची स्थापना झाली या संघटना महिलांच्या अनेक समस्या व मागण्या याचा पाठपुरावा करू लागल्या त्यातूनच प्रथम स्त्रियांना मतदानाचा अधिकार मतदाना बरोबर निवडणुकीला उभे राहण्याचा अधिकार अशा सुधारणा १९३५ पर्यंत होत गेल्या. भारतात मुंबई येथे ८ मार्च १९४३ या दिवशी पहिला महिला दिन साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यानंतर १९५० सालापासून भारतीय राज्यघटनेने स्त्रियांना समानतेचा अधिकार दिला आहे.

स्त्री पुरुष समानता

आज पुरुषांना व स्त्रियांना समान हक्क आहे पण तरीही समानतेची मुक्ती आपणास कागदोपत्री दिसते स्त्री-पुरुषांमधील असमानता नाहीशी करणे म्हणजे स्त्रीमुक्ती, स्त्री सुशिक्षित झाली म्हणजे शिक्षणामुळे आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनेल त्यातूनच स्वावलंबनाची गरज भावना स्त्रीमध्ये जागृत होऊन ती खंबीर बनण्यास मदत होईल तरी वैचारिक दृष्ट्या जेव्हा स्वतंत्र होईल तेव्हा खरी स्त्रीमुक्ती होईल.

आताच्या एकवीसाव्या शतकात भारतामध्ये सुशिक्षित महिला स्वतंत्रपणे स्वतःच अस्तित्व निर्माण करून उभे राहतात पण अजूनही आपल्या देशात काही स्त्रिया स्वतःच्या जगण्यासाठी धडपड करत असतात त्या स्त्रियांसाठी समाजातील सुशिक्षित स्त्रियांनी पुढाकार घेऊन महिला दिन विशेष कार्यक्रम ठेवावे त्याचबरोबर हा दिवस साजरा करावा.

भारतातील थोर महिला

राजमाता जिजाऊ (शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या आई)
झाशीची राणी लक्ष्मीबाई (इंग्रजांशी दोन हात करणाऱ्या योद्धा)
सावित्रीबाई फुले (पहिल्या महिला शिक्षिका)
पंडित रमाबाई (संस्कृत विद्वान)
रमाबाई रानडे (स्त्री सुधारक आणि समाजसेविका)
सोराबजी (पहिल्या महिला बॅरिस्टर)
सुचेता कृपलानी (पहिल्या महिला मुख्यमंत्री)
सरोजिनी नायडू (पहिल्या महिला राज्यपाल)
अरुण असफ अली (पहिल्या महिला महापौर)
आनंदीबाई जोशी (पहिल्या महिला डॉक्टर)
सरला ठाकराल (पहिल्या महिला पायलट )
होमाई व्यारावाला (पहिल्या महिला छायाचित्रकार)
सी. बी. मुथांम्मा (भारताच्या परदेशातील पहिल्या महिला राजदुत)
इंदिरा गांधी (पहिल्या महिला पंतप्रधान)
फातिमा बीबी (पहिल्या महिला न्यायाधीश)
किरण बेदी (पहिल्या महिला पोलीस अधिकारी)
पद्मावती बंडोपाध्याय (पहिल्या महिला एअर मार्शल)
सुरेखा यादव (पहिल्या महिला ट्रेन ड्राइव्हर)
प्रतिभाताई पाटील (पहिल्या महिला राष्ट्रपती)
बचेंद्री पाल (एवरेस्ट शिखर सर करणारी पहिली महिला)
मदार तेरेसा (समाज सेविका)
लक्ष्मी सेहगल (आझाद हिंद सेनेच्या महिला शाखेच्या प्रमुख)
दुर्गा भागवत (लेखिका आणि समाजसेविका)
मृणाल गोरे (समाजसेविका)
लता मंगेशकर (गायिका)
पी. वि. सिंधू (पहिली महिला ऑलिम्पिक मेडलिस्ट)
दीप्ती करमरकर (पहिली महिला मेडलिस्ट जिम्नॅस्टिक)
साक्षी मलिक (ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट )
सिंधुताई सपकाळ (अनाथांची माय)
मेधा पाटकर (समाज सेविका)
नीरजा भानोत (आपला जीव देऊन शेकडो प्रवाशांचे प्राण वाचविले)
अरुंधती रॉय (बुकर अवॉर्ड विजेती पहिली महिला)
गौरी देशपांडे (थोर लेखिका)
पी टी उषा (धावपटू)
मंदा आपटे (समाज सेविका)
इरोम शर्मिला (समाज सेविका)
मैथिली राज (भारतीय महिला क्रिकेटपटू)
मेरी कोम (जागतिक बॉक्सिंग चॅम्पियन)
सायना नेहवाल (महिला बॅडमिंटनपटू)
सानिया मिर्झा (महिला टेनिसपटू)

 3,101 total views,  8 views today

Share This :

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *