होलिका दहन – पौराणिक कथा भक्त प्रल्हाद आणि होलिका
होळी, वसंत ऋतूमध्ये साजरा केल्या जाणारा एक महत्त्वाचा भारतीय आणि नेपाळी लोकांचे सण आहे. हा सण हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो.
रंगाचा हा सण परंपरागतपणे दोन दिवस साजरा करतात. पहिल्या दिवशी रात्री होळीचे दहन केले जाते आणि दुसर्या दिवशी एकमेकांवर रंग उडून रंगाचे होळी खेळली जाते, त्याला धुलीवंदन असे म्हणतात.
पौराणिक कथा
होळी साजरी करण्यामागे एक प्राचीन इतिहास आहे. हिरण्यकश्यपू नावाचा असुर राजा होता. भगवान शंकराला त्यांनी प्रसन्न करून त्यांच्याकडून त्याने त्याला कोणी, पाताळात जमिनीवर तसेच आकाशात मारू शकणार नाही असा वर घेतला. त्यामुळे तो खूप अहंकारी झाला आणि स्वतःला देवापेक्षा बलवान समजायला लागला. याच अहंकारामुळे तो देवदेवतांचा तिरस्कार करू लागला खासकरून श्री विष्णूंचा.
कारण त्याचा मुलगा प्रल्हाद हा श्री विष्णूंचा परमभक्त होता. सतत त्यांचेच नामस्मरण करत आणि त्यांचेच गुणगान गात असत. हे हिरण्यकश्यपूला अजिबात आवडत नसत. त्याने प्रल्हादाला समजावण्याचा तसेच घाबरवण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु भक्त प्रल्हादवर त्याचा काही परिणाम झाला नाही.
म्हणून भक्त प्रल्हादला मारण्यासाठी हिरण्यकश्यपू राजाने आपली बहिण होलिकाला घेऊन एक योजना बनवली. होलीकेला एक वरदान मिळालं होतं की, ती आगीवर विजय प्राप्त करू शकते. तसेच कोणतीही आग तिला भस्म करू शकत नाही.
हिरण्यकश्यपू राजाने होलीकेला भक्त प्रल्हादाला घेऊन आगीच्या चितेवर बसण्यास सांगितले. प्रल्हाद आपल्या आत्यासोबत त्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात तल्लीन झाला. थोड्याच वेळात होलिका जळायला लागली. इतक्यात एक आकाशवाणी झाली आणि त्यानुसार होलिकेला आठवलं. की तिला मिळालेल्या वरदानात असे सांगितले होते की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वत: जळून राख होईल.
भक्त प्रल्हादाच्या पाठीशी स्वयं भगवान विष्णू असल्यामुळे अग्नी त्यांचे काही करू शकली नाही.
होलिका मात्र त्या अग्नीत जळून भस्म झाली. अशाप्रकारे त्यादिवशी लोकांनी उत्सव साजरा केला. आणि तो दिवस ‘होलिका दहन’ म्हणून ओळखू लागले. दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उधळून हा सण उत्सवात साजरा करू लागले.
होळीच्या वेगवेगळ्या परंपरा
तशी होळी संपूर्ण भारतात साजरी केले जाते. पण प्रत्येक प्रदेशात होळीचे वेगवेगळे रंग पाहायला मिळतात. महाराष्ट्रात काही ठिकाणी होळी पेटवून एकमेकांच्या नावाने बोंबा मारतात तर, कोकणातील शिमगा तर जगप्रसिद्ध आहे. ग्रामदेवतांच्या पालख्या नाचविल्या जातात आणि नारळ टाकून होळीचे होम पेटविले जातात.

आपण होळीच्या अग्नीमध्ये निराशा, दुःख, दारिद्र्य, आळस यांचे दहन करून आणि सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती, आरोग्य लाभो अशी प्रार्थना करूया.
होळीच्या मंगलमय शुभेच्छा!
2,143 total views, 1 views today
Very nice information share