गुढी पाडवा – हिंदू नव वर्ष

गुढीपाडवा हा भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला वसंत ऋतूच्या पहिला दिवस साजरा केला जातो. हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. त्या दिवशी नवीन वस्तू खरेदी व्यवसाय प्रारंभ सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात.

अशी आख्यायिका आहे की ब्रह्मदेवाने या दिवशी विश्वाची निर्मिती केली. तसेच प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून त्या दिवशी अयोध्येत प्रवेश केला आणि लोकांनी गुढी उभारून विजयोत्सव साजरा केला.

Gudhi Padva
Gudhi Padva

गुढी उभारण्याची प्रथा

गुढी हि ब्रम्हध्वजाचं प्रतीक मानलं जात, गुढी उंच बांबूपासुन काठी तयार केली जाते हे काठी स्वच्छ धुऊन त्या काठीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात, तसेच वरच्या टोकाला कडुलिंबाची डहाळी आंब्याची पाने फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर कळस म्हणून तांब्याचा गडू बसविला जातो. गुढी लावायची जागा स्वच्छ करून त्यावर रांगोळी काढतात. घरच्या बाहेर बांबू पाटावर उभा केला जातो आणि तयार केलेली गुढी दारासमोर उंच नीट लावतात. गुढीची पूजा करून काठीला गंध फुले अक्षता वाहतात. दुपारी गुढीला गोड नैवेद्य दाखवतात आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी पुन्हा हळद-कुंकू फुले वाहून पुढे उतरवण्याची प्रथा आहे. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.

या दिवशी सर्वजण पारंपरिक कपडे परिधान करून देवदर्शन घेतात. तसेच स्त्रीया आकर्षक रांगोळी काढतात. घरी गोडधोडाचा नैवैद्य देवाला आणि गुढीला अर्पण केले जाते. चांगल्या आरोग्यासाठी कडुलिंबाची पाने, गूळ आणि धने एकत्र करून त्याचादेखील प्रसाद वाटलं जातो तसेच त्याची असलेली कडू आणि गोड चव आयुष्यात येणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवच प्रतीक आहे.

गुढीपाडव्याच्या दिवशी बऱ्याच शहरात पहाटे मिरवणुका काढल्या जातात. लोक पारंपरिक वस्त्रात या मिरवणुकीत भाग घेतात स्त्रिया नऊवारी नेसून यात सहभागी होतात. तसेच ढोल ताशाच पथक, लहान मुले रंगीत वेशभूषा, काही ठिकाणी साहसी खेळ आणि बाईक रॅली देखील असते.

गुढीपाडव्याला दक्षिण भारतात उगाडी म्हणून साजरा केला जातो तसेच सिंधी लोक याला चेटी चांद म्हणून साजरा करतात.

आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! तसेच येणार नववर्ष आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

 716 total views,  2 views today

Share This :

Anand Sontakke

Anand Sontakke is a Masters in International Business having 10 years experience in field of Import-Export

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *