अलिबागकरांनो सावधान!

आजच्या सकाळ वृत्तपत्रात एक अलिबाग संबंधी बातमी वाचली. रायगड जिल्ह्यात कर्जत-आपटा एसटी बस मध्ये सापडलेला बॉम्ब हा अलिबागमधील पर्यटकांसाठी होता. एका एसटी बस कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे तो बॉम्ब कर्जत-आपटा एसटी बस मध्ये गेला.

याचा अर्थ दहशदवाद्यांच्या रडारवर अलिबागसुद्धा आहे. त्यामुळे आता प्रत्येक अलिबागकाराची जबाबदारी वाढली आहे.

आज दररोज हजारोंच्या संख्येत पर्यटक अलिबागला येत असतात, बरेचसे उद्योगधंदे या पर्यटकांवर अवलंबून आहेत. आज हॉटेल इंडस्ट्री, रेस्टोरंटस तसेच वॉटरस्पोर्ट, ट्रॅव्हल एजन्ट इत्यादी.

Alibag Beach

एखादी छोटीशी घटना खूप जीवितहानी तसेच आर्थिक नुकसान करू शकते. त्यामुळेच प्रत्येकाने सजग असणे गरजेचं आहे. यासाठीच काही टिप्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत.

SAFETY TIPS

  1. कोणत्याही बेवारस वस्तुंना हात लावू नका. तसेच त्याची सूचना नजीकच्या पोलीस स्टेशनला द्या.
  2. आज अलिबागमध्ये हजारो पर्यटक येत असतात. ग्राहक म्हणून प्रत्येकाची चौकशी करणे कठीण आहे. परंतु जर काही संशयित वाटलं तर आजूबाजूच्या परिस्थितीचा आढावा घेऊन त्याची माहिती जवळील पोलीस कर्मचाऱ्याला द्यावी.
  3. हॉटेल मालकांनी रूम्स देताना आयडी कार्ड आणि आणलेल्या सामानाची तपासणी करून आणि संपूर्ण माहिती घेऊनच रूम द्यावी तसेच जर काही धोका वाटला तर स्वतःला सुरक्षित ठेवून तपास यंत्रणेला माहिती द्यावी.
  4. प्रत्येक गर्दीच्या ठिकाणी जवळील पोलीस स्टेशन, फायर ब्रिगेड तसेच ऍम्ब्युलन्स यांच्या नंबर्सचे फलक लावावेत.
  5. कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नका आणि पसरू देऊ नका.
  6. गर्दीची ठिकाणी असलेल्या विक्रेतांना नजर ठेवण्यास सांगा. तसेच आपत्कालीन परिस्थितीत काय करावे आणि करू नये याची ट्रेनिंग द्या.
  7. नगरपालिकेच्या सहाय्याने प्रत्येक ठिकाणी नागरिकांनी घ्यायची काळजी स्पष्टपणे अधोरेकीत करा.
  8. पोलीस तपासणीत सहकार्य करा.
  9. सिव्हिल डिफेन्स सारख्या योजना सामाजिक संस्थांनी राबवायला हव्या.
  10. तपासणीच्या नावाखाली पर्यटकांना त्रास होईल असं काही करू नका.

आपली सुरक्षा आपल्याच हाती. फक्त पोलीस आणि सरकारवर अवलंबून न राहता प्रत्येकानी आपली जबाबदारी घेतली तर नक्कीच अशा घटनांना आळा बसेल.

तर अलिबागकर घ्याल ना काळजी?

 683 total views,  1 views today

Share This :

Anand Sontakke

Anand Sontakke is a Masters in International Business having 10 years experience in field of Import-Export

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *